ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गडचांदूर येथे जागतीक कामगार दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून आज दिनांक १ मे २०२५ ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रिपब्लिकन कार्यकर्ते अशोककुमार उमरे, रिपब्लिकन कार्यकर्ते तथा अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, रिपब्लिकन कार्यकर्ते ज्ञानेश्वर गोखरे आणि रिपब्लिकन कार्यकर्ते आकाश ताकसांडे यांनी रोजंदारी कामगार शकूनबाई, बंडू पाटील, अम्बुजा चौक येथे भेलपुरीचा स्टाल लावून स्वतंत्र व्यवसाय करणारे कालीराम चिडे तसेच भाजीपाल्याच्या व्यवसायावर सर्व कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या रेष्माताई खोब्रागडे हरदोना खुर्द यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.