घुग्घुसमध्ये फुटपाथ व्यावसायिकांचा अतिक्रमण, प्रशासन मौन

चांदा ब्लास्ट
शहरात फुटपाथ व्यवसाय दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, परंतु नगर परिषदेमार्फत निर्धारित जागांवर व्यवसाय न करता हे व्यावसायिक मुख्य महामार्गालगत अतिक्रमण करून दुकाने थाटत आहेत. त्यामुळे केवळ सामान्य नागरिकांना त्रास होत नाही तर वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत होत आहे.
ही समस्या विशेषतः चंद्रपूर-वणी महामार्ग (MH-7) येथे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. येथे फुटपाथ व्यावसायिक बेकायदेशीररित्या रस्त्याच्या कडेला दुकाने लावून बसतात. या मार्गावर अवजड वाहनांची सतत वर्दळ असते, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा घुग्घुस ट्रॅफिक पोलीस आणि नगर परिषद प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगर परिषद व पोलिस प्रशासनाला या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नागरिकांचे मत आहे की प्रशासनाने मोठ्या दुर्घटनेची वाट पाहण्याऐवजी त्वरित पावले उचलली पाहिजेत, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण आणि वाहतुकीची शिस्त कायम राहील.
आता हे पाहावे लागेल की प्रशासन या गंभीर समस्येकडे कधी आणि कसे लक्ष देते, अथवा कायम मौन राहते. शहरवासियांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कृतीकडे लागले आहे.