ताज्या घडामोडी

75 फूट उंचीच्या तिरंग्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

चांदा ब्लास्ट –

अतुल कोल्हे भद्रावती :-
भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी हा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी आठ वाजता शहरातील सेवादल मैदानात 75 फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भद्रावती नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरिक उपस्थित होते. भद्रावती तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सध्या आपल्या प्रोफेशनल पिरेडवर असलेले उपविभागीय अधिकारी रणजीत यादव यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तथा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भद्रावती पोलीस स्टेशनच्या प्रांगणात ठाणेदार विपिन इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस स्टेशनमधील अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय शहरातील गांधी चौक, हुतात्मा स्मारक, वनपरिक्षेत्र कार्यालय, शहरातील शाळा तथा महाविद्यालयातही ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गणराज्य दिनाच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये