ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना येथे राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथक कार्यान्वित करण्याची मागणी

हत्तीरोग नियंत्रणासाठी कोरपना व जिवती तालुक्यांसाठी स्वतंत्र पथकाची आवश्यकता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.  अशोक डोईफोडे

सध्या राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राजुरा येथे पथक कार्यरत आहे. या पथकाचे एक उपपथक गडचांदूर येथेही कार्यरत आहे. मात्र, कोरपना व जिवती हे दोन्ही तालुके मोठ्या भौगोलिक क्षेत्रफळावर पसरलेले असल्याने व येथील दुर्गम व आदिवासी भागात हत्तीरोगासारख्या आजाराचा धोका अधिक असल्यामुळे स्वतंत्र पथकाची आवश्यकता जाणवते आहे.

राजुरा येथील मुख्य कार्यालयाचे कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे कोरपना व जिवती तालुक्यात प्रभावी नियंत्रण व वेळेवर सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे राजुरा पथकाचे विभाजन करून कोरपना येथे राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रणाचे स्वतंत्र पथक निर्माण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोरपना तालुक्यातील अनेक भाग आदिवासी व मागासवर्गीय असल्याने येथे हत्तीरोगासारख्या आजाराच्या नियंत्रणासाठी अधिक वेगळ्या प्रयत्नांची गरज आहे. विशेषतः सीमावर्ती भाग, डोंगराळ व जंगल भागांमध्ये नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी स्वतंत्र पथकाची स्थापना होणे अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

राज्य व जिल्हा आरोग्य प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर कोरपना येथे स्वतंत्र राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथकाची स्थापना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये