ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालयात पोषण पंधरवडा उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे ‘पोषण पंधरवडा’ मोठ्या उत्साहात व सक्रिय सहभागाने 8 ते 22 एप्रिल दरम्यान साजरा करण्यात आला.

या पंधरवड्याच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी विद्यार्थ्यांना पोषणाचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, “संतुलित आहार व पोषण हा प्रत्येक आरोग्यपूर्ण जीवनाचा मूलाधार आहे. शेतकरी विद्यार्थ्यांनी पोषक अन्नाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि ते समाजातही पोहोचवले पाहिजे.” पोषण पंधरवड्यात विविध उपक्रम राबवले गेले. विद्यार्थ्यांसाठी “संतुलित आहाराचे महत्त्व” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यासोबतच लहान मुलांना व त्यांच्या पालकांना पौष्टिक आहाराची माहिती देण्यात आली. ‘पोषण रॅली’, ‘पोस्टर प्रदर्शन’, ‘स्वच्छता व आहार’ विषयक कार्यशाळा घेण्यात आली. महाविद्यालयात झालेल्या निबंध स्पर्धा व पोस्टर प्रदर्शनामध्ये कोमल इंगळे, तृप्ती मुंडे, प्रेशीका जाधव, सोनाली ताळे, अश्विनी गीके, कल्याणी गरड, निखिल धंदारे, योगेश काळुसे, जय गव्हाळे व इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये व स्थानिक नागरिकांमध्ये पोषणाच्या महत्वाबाबत जनजागृती करण्यात आली.

पोषण पंधरवड्याच्या यशस्वी आयोजनासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण ठाकरे व रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा अश्विनी जाधव यांनी परिश्रम घेतले.तसेच या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये