ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे पथकाने पोलीस स्टेशन पुलगाव येथील गुन्ह्यातील पसार असलेल्या आरोपीचा शोध घेऊन ठोकल्या बेड्या 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

            दिनांक 15/10/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक पोलीस स्टेशन पुलगाव येथील अपराध क्रमांक 848/2025 कलम 11(1) D, 59, 5 (B), 9, 11 प्राणी छळ अधिनियम महा. पशु संरक्षण अधिनियम सहकलम 3(5) BNS सहकलम 130(3), 177, 119 मो. वा. का. च्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी मोहम्मद शहजाद खान पीर खान, रा. केडिया ऑईल मील, वेदपुरा, अकोला, जिल्हा – अकोला याच्या शोध कामी समांतर तपास करीत असताना सदर आरोपी बाबत स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाला कोणतेही माहिती नसताना पथकाने आरोपीबाबत माहिती काढून माहितीच्या आधारे त्याचा अकोला जिल्हा – अकोला येथे शोध घेतला असता पाहिजे आरोपी नामे मोहम्मद शहजाद खान पीर खान, वेदपुरा, अकोला परिसरात राहत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने तात्काळ पथक तात्काळ सदर परिसरात रवाना होऊन पाहिजे आरोपीचा शोध घेत असता पाहिजे आरोपी नामे मोहम्मद शहजाद खान पीर खान, वय 40 वर्षे, रा. केडिया ऑईल मील, वेदपुरा, अकोला, जिल्हा – अकोला हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन, त्यास ताब्यात घेतल्या बाबत त्याचे नातेवाईक यांना माहिती देऊन वरील पाहिजे आरोपी यास पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन पुलगाव यांचे ताब्यात देण्यात आले.

          सदर यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मनोज धात्रक, महादेव सानप, हर्षल सोनटक्के, अभिषेक नाईक, अखिल इंगळे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी पार पाडली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये