ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नंदकिशोर देशपांडे राज्यस्तरीय होमिओपॅथी जीवन गौरव पुरस्कार ने सन्मानित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हनीमन यांच्या जयंतीचे औचित्य साधून होमिओपॅथी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांना होमिओपॅथी जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

देऊळगाव राजा येथील डेबको या होमिओपॅथी औषध निर्मिती संस्थेचे प्रमुख श्री नंदकिशोर देशपांडे यांना केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

यावेळी उल्हासनगर येथील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ अमरसिंग गौतम, छत्रपती संभाजी नगर जिल्हयातील पळसखेडा येथील होमिओपॅथी तज्ञ डॉ बाळासाहेब महानोर यांना सुद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,

केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या भाषणात होमिओपॅथी उपचार पद्धती च्या माध्यमातून विविध प्रकारच्या व्याधीवर उपचार सुरू आहेत, नागरिकांना सहज आणि माफक दरात होमिओपॅथी औषध मिळावी यासाठी जेनरिक औषध च्या धर्तीवर देशात आयुष औषधालय स्थापन करण्या संदर्भात केन्द्र सरकारविचाराधीन असल्याचे म्हंटले,

या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड, शासकीय वैद्यकिय महविद्यालय चे अधिष्ठाता डॉ कैलास झिने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, डॉ. दादासाहेब कवीश्वर, डॉ  अजित शिरसाट, डॉ प्रशांत पाटील, डॉ दुर्गासिंग राजपूत, यांच्या सह होमिओपॅथी डॉक्टर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये