ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक/प्राचार्य महेंद्रकुमार ताकसांडे उपस्थित होते.

तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. प्रशांत खैरे, प्रा. जहिर सैय्यद , प्रा. विजय मुप्पीडवार कु. ज्योती चटप उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करून त्यांचे विचार सर्वानी अंगीकारण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन शिक्षक बी एम मरसकोल्हे यांनी, तर उपस्थितांचे आभार श्री. सुरेश पाटील यांनी मानले कार्यक्रमाला शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये