ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऑनलाईन फसवणूक – फिर्यादीचे तक्रारीवरून संबंधितावर गुन्हा नोंद

एकुण कि.१ लाख ९० हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादी श्री. विलास नारायण चोपडे, वय ३० वर्षे, रा. देववाडी, ता. कारंजा, जि. वर्धा यांचे मिनी बँक व ऑनलाईन सेन्टर नावाचे दुकाण आहे. दि. ०९.११.२०२३ रोजी फिर्यादीचे दुकाणात ०२ अनोळखी ईसम आले. त्यातील एकाने राजेश मेश्राम, रा. चंद्रपुर असे नाव सांगुन पे टिएम मध्ये नोकरी करतात असे सांगितले. तसेच त्यांची कंपनी फिर्यादी सारख्या व्यवसायीकांना व्यवसाय करण्याकरीता पे टिएम. आय.डी. देत असुन त्यातुन पैसे ट्रांन्सफर करण्याचे काम करू शकतात. त्याकरीता पे.टिएम. ५०,०००/- रू ते १,००,०००/- रू. केडीट स्वरूपात देत असतात. सदर स्किमचा फायदा घ्यायचा असल्यास मोबाईल मध्ये ०२ अप्लीकेशन इंन्स्टॉल कराव्या असे सांगुन फिर्यादीचे मोबाईल मध्ये NYE (Rapipay) o paytm अशा अप्लीकेशन इन्स्टाल केल्या व फियादीचे आधार कार्ड व पॅन कार्ड घेतले.

त्यानंतर दि. १४.११.२०२३ रोजी फिर्यादीचे बँक खात्यावर ९५,५७५/- रू. क्रेडिट झाल्याचे दिसले. याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली असता केडीट स्वरूपात वापरण्याकरीता आले असे सांगितले व फिर्यादींना क्यु. आर. कोड पाठवुन रक्कम पाठविण्यास सांगितल्यानंतर त्यांचे वॉलेट सुरू होईल असे सांगितले.

त्यानुसार फिर्यादी क्युआर कोड व आय.एम.पी.एस. चे माध्यमातुन एकुण ९५,५७५/- रू वळते केले. परंतु तरीही फिर्यादींचे पे.टिएम वॉलेट सुरू न झाल्याने फिर्यादीने फोन करून विचारणा केली असता विचारणा केली रक्कम एका ट्रांजेक्शन मध्ये वळती न केल्याने पे.टिएम वॉलेट सुरू झाले नाही त्यावेळी फिर्यादीना समजले त्यांचे नावे ऑनलाईन १,००,०००/- रू चे लोन घेवुन फसवणुक करण्यात आलेली आहे. अशा आशयाचे फिर्यादीचे तक्रारीवरून दि. २४. ११.२०२३ रोजी सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तांत्रीक पध्दतीने तपास करून गुन्हयात आरोपी करण नामदेवराव चौधरी, रा. बैरागीपुरा नागपुर व सुधीर हरीराम कुशवाह, रा. प्रसाद नगर, गोधनी रेल्वे, नागपुर यांना दि. ०७.११.२०२३ रोजी गुन्हयात अटक करण्यात आली होती व आरोपींचे ताब्यातुन नगदी ७०,०००/- रू व वनप्लस कंपनीचे ०२ मोबाईल, ०१ रेडमी कंपनीचा मोबाईल, ०१ लाव्हा कंपनीचा मोबाईल, फिर्यादीचे आधार कार्ड व पॅन कार्ड ची झेरॉक्स प्रत, असा एकुण जु.की. १,९०,५०० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

गुन्हयात फिर्यादींची फसवणुक झालेली रक्कम ७०,०००/- रू. मा. नूरूल हसन, (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांचे हस्ते दि. ०७.०२.२०२४ रोजी फिर्यादी विलास नारायण चोपडे यांना सुपूर्त करण्यात आली.

सदर गुन्हयाचा तपास मा.  नूरूल हसन, पोलीस अधीक्षक सा. वर्धा, मा.  सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांचे मार्गदर्शनात श्री. कांचन पांडे, पोलीस निरीक्षक, पो.हवा / निलेश तेलरांधे, अनुप राऊत, रणजित जाधव, वैभव कट्टोजवार, व पो.शि/प्रतिक वादीले, यांनी केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये