रानटी डुकराच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी
आर्थिक मोबदला देण्याची गावकऱ्यांची वन विभागाकडे मागणी
चांदा ब्लास्ट : अतुल कोल्हे भद्रावती :-
तालुक्यातील मासळ येथे शेतात काम करणाऱ्या शेतमजुरावर रानटी डुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज गुरुवारला घडली. जखमीला ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नागेश शंकर कोयलवार वय ३२ राहणार मासळ असे जखमी शेतमजुराचे नाव आहे. सध्या शेतीचा हंगाम चालू असल्याने शेतीचे कामे सुरू आहे नागेश हा मासळ येथील शेतात काम करत असताना अचानक त्याच्यावर रानटी डुकरांनी हल्ला केला हा प्रकार बघता तिथे असणारे इतर शेतमजूर सैरावैरा पडाले नंतर काहींनी त्या डुकरांना पळून लावले यात नागेश हा गंभीर जखमी झाला त्याला ग्रामीन रुग्णालय भद्रावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . या शेतमजुराला वन विभागाने आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे