दालमिया सिमेंट कंपनीत मृत पावलेल्या आयचर चालकाच्या कुटुंबाला 19 लाख रुपये व एकास नोकरी
आमदार देवराव भोंगळेची मध्यस्थी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
जिवती : कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत सिमेंट बॅग भरण्यास गेलेल्या आयशर चालकाचा गाडी मागील पल्ला लावताना कंपनीतील चालकाने हयगय करुन, गाडी मागे घेतल्याने आयचर चालकाचा पल्ल्यात दबून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी राञौच्या सुमारास घडली. शुक्रवार मध्यराञौ पासून दिनांक : 05/04/2025 चे दुपारी 12.00 वाजेपर्यंत मृतकचे नातेवाईक व कंपनी यामध्ये संघर्ष सुरू होता. अखेर कंपनीने मृतक आयशर चालकाच्या कुटुंबाला 19 लाख रुपये व कंपनीत एक नोकरी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.
प्रकाश बळीराम राठोड, वय 39 वर्षे, रा. वार्ड नं. 3, जिवती, ता.जिवती असे मृत आयशर वाहन चालकाचे नाव असून, दालमिया सिमेंट कंपनीत सिमेंट बॅग भरल्यानंतर काटयावर उभ्या असलेल्या कंपनीतील गाडीने हयगय करुन, मयत त्याच्या गाडीमागील पल्ला लावताना अचानक दाबल्याने, कंपनीचे व्यवस्थापनाने जखमीस तात्काळ रुग्णालयात घेऊन न जाता मृतकचे घटनास्थळ कंपनी बाहेर दाखविण्यासाठी 2-3 तास कंपनीत गंभीर जखमी अवस्थेत ठेवल्याने मयताची प्रकृती गंभीर झाल्याने, चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले.
तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती आमदार श्री.देवराव भोंगळे यांना मिळताच त्यांनी कार्यतत्परता दाखवून, दालमिया सिमेंट कंपनीतील व्यवस्थापनशी भ्रमणध्वनीवर चर्चा करुन, भाजयुमो.चे जिल्हाध्यक्ष महेश देवकते यांना कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याची सूचना केली. त्यावरुन महेश देवकते व तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते गोविंद टोकरे, आनंद कदम, शंकर माधव चव्हाण, राजेश राठोड यांनी मृतक कामगाराच्या परिवाराला न्याय मिळावा, यासाठी कंपनी व्यवस्थापन बरोबर चर्चा घडवून आणली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतली. दालमिया कंपनीचे व्यवस्थापनाचे पदाधिकारीसुद्धा पोलीस स्टेशनला पोहोचले.तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने हे सुद्धा सकाळी ६ वाजता पासून चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन होते.त्यांनी सुद्धा भ्रमणध्वनीद्वारे महेश देवकते व कंपनी प्रशासन यांच्याशी चर्चा केली.
मृतकाचा कुटुंबातील एका सदस्याला कंपनीत स्थायी नोकरी व आर्थिक साहाय्य देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली; परंतु व्यवस्थापनाच्या ताठर भूमिकेमुळे मागणी मान्य होत नव्हत्या. अखेर आमदार देवराव भोंगळे यांनी सूचना दिल्याने, तब्बल दहा तासांचा वाटाघाटीनंतर अखेर मागण्या मान्य झाल्या.
कंपनी व्यवस्थापनाने मृतकाच्या कुटुंबातील एक सदस्यांना नोकरी व 19 लाख रुपये देण्याचे मान्य केल्यानंतर चर्चा थांबविण्यात आली. मृतकाच्या कुटुंबाला कंपनीकडून 18 लाख 50 हजाराचा धनादेश देण्यात येणार असून, अंत्यसंस्कारसाठी 50 हजार नगदी रक्कम देण्यात येणार आहे.
आमदार देवराव भोंगळेची मध्यस्थीने प्रकरण निवळले.
कंपनी व्यवस्थापन व भाजपा.कार्यकर्त्याचा संघर्ष शिगेला पोहोचला असताना तब्बल दहा तास आमदार देवराव भोंगळे यांचे मार्गदर्शनार्थ महेश देवकते व त्याचे सहकारी यांनी व्यवस्थापन व मयताच्या नातेवाईकांची बाजू एकमेकांसमोर मांडली. नातेवाईकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाला त्यांनी विनंती केली आणि कंपनी व मृतकचे नातेवाईक यांचे संघर्ष मिटविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.