पंचशील बौध्द विहारात चक्रवर्ती अशोक सम्राट जयंती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती : भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ.भीमराव य.आंबेडकर यांचे आदेशानुसार चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३२९ वी जयंती भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व शहर शाखा जिवती यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक त्रीशरण पंचशीला घेण्यात आली. याप्रसंगी शहराध्यक्ष व्यंकटी कांबळे, शहर सरचिटणीस शरद वाटोरे, सचिव (संरक्षण विभाग) देविदास साबने, संघटक गणेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस चंदू रोकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष दिपक साबने यांनी मानले. यावेळी तालुका कोषाध्यक्ष बळीराम काळे, (सचिव पर्यटन व प्रचार विभाग) अमोल कांबळे, प्रदीप काळे, सचिव (संरक्षण विभाग) प्रशांत कांबळे यांचेसह जिवती तालुका व शहर शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जयंती कार्यक्रमानंतर भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखेची बैठक घेण्यात आली. यात जगातील बौद्धांची विरासत असलेल्या बुध्दगया येथील महाबोधी महाविहारावरील गैरबौद्ध हिंदू तेथील प्रस्थापित ब्राह्मण पंडित व पुजारी यांनी केलेले अतिक्रमण काढून महाबोधी महाविहाराचे प्रबंधन बौद्धांकडे सोपविण्यात यावे, तसेच १९४९ चा बुध्दगया मंदीर कायदा रद्द करावा याकरीता तालुक्यात स्वाक्षरी अभियान राबवून राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, बिहारचे मुख्यमंत्री यांना निवेदन देणे या मुख्य विषयासह अनेक विषय घेऊन ठराव पारित करण्यात आले.