ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

म्हाडा कॉलनी (बरबडी) येथे “रो वॉटर एटीएम मशिन रूमचे वर्धा जिल्ह्यात पहिलेच लोकार्पण!

विकास कामांचा झंझावात पुढे ही सुरुच राहिल ; एमआयडीसी - म्हाडा कॉलनी बरबडीचे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मुनेश्वर यांचा एल्गार!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

ग्रामपंचायत बरबडी व शासना अंतर्गत लाखो रुपये निधी मंजूर करुन म्हाडा कॉलनी, एमआयडीसी कृष्ण नगर,महसुल कॉलनी,सोहम नगर प्रभाग क्रमांक ४ च्या विकास कामांचा झंझावात पुढे ही सुरु राहिल.बदलत्या ग्रामीण भागाचा नवा अध्याय लिहिल्या जाईल असे एमआयडीसी – म्हाडा कॉलनी बरबडी चे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मुनेश्वर हे म्हाडा कॉलनी (बरबडी) येथे “रो वॉटर एटीएम मशिन रूम व ओला व वाळला कचरा चार्जिंग बॅटरी घंटा गाडीचे लोकार्पण सोहळा या कार्यक्रमा प्रसंगी बोलतांना म्हणाले.

बरबडी एमआयडीसी म्हाडा कॉलनी वार्ड क्रमांक ४ मध्ये विकास कार्यात तत्पर असलेले ग्रापंचायत सदस्य महेंद्र मुनेश्वर , श्रीमती सुलोचना अनकर यांच्या अथक प्रयत्नांनी. आज दिनांक १६ मार्च २०२४ शनिवार रोजी सकाळी १०.३० वाजता एमआयडीसी म्हाडा कॉलनी बरबडी येथिल नऊ लक्ष अधिक प्राकलान किंमत असलेल्या पिण्याचे स्वच्छ व थंड पाणी “रो वॉटर एटीएम मशिन रूमचे लोकार्पण गावाच्या सरपंच श्रीमती संगीताताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.म्हाडा कॉलनी बरबडी येथिल “रो वॉटर एटीएम मशिन रूम नागरिकांच्या जीवनाआवश्यक सेवेतील पिण्याचे स्वच्छ व थंड पाणी सेवा देणारी वर्धा जिल्ह्यातील एकमेव पहिली जल मशिन आहे. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मुनेश्वर यांनी कळविले आहे.

विशेष म्हणजे म्हाडा कॉलनी वार्ड क्रमांक ४ येथील प्रबुद्ध बुद्ध विहारचे दुरुस्ती बांधकाम व सौंदर्यीकरण तसेच संजय बहादुरे ते प्रदिप रामटेके ते शशिकांत भस्मे यांचे घरासमोरील रहदारी रस्त्याच्या सिमेंटीकरण बांधकाम विकास कामाचा भूमीपूजन सोहळा यावेळी बरबडी येथील सरपंच श्रीमती संगीताताई शिंदे यांचे हस्ते आणि ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मुनेश्वर, सुलोचनाताई अनकर,प्रज्ञाताई झामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे.यावेळी प्रामुख्याने संजय देशमुख, गजानन शिंदे,सुभाष खुजनारे,निरंजन आत्राम,गणेश चौधरी,मनिशाताई गोसेवाडे, पाटनेताई,पुष्पाताई रामटेके,भालकरताई,विभाताई बहादुरे,रत्नमाला मुनेश्वर,आदी म्हाडा कॉलनी नागरिकांची उपस्थिती होती.

लोकार्पण सोहळा व भूमिपूजन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे शुभम नांदुरकर यांनी आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये