ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूरचे नवनियुक्त ठाणेदार राजकमल वाघमारे याचा मजलिसने केला सत्कार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 गडचांदुर पोलीस स्टेशन चे नव नियूक्त ठाणेदार राजकमल वाघमारे याची नुकतीच मजलिस ए इत्तेहदुल मुसलेमिन अर्थात ए आय एम आय एम या राजकीय पक्षाचे तालुका सल्लागार पत्रकार मो.रफिक शेख सदस्य शांतता समिती गडचांदूर यांनी नुकतीच भेट घेतली व त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शहरातील अनेक समस्या विषयी खेळीमेळीचे वाता वरणात चर्चा करण्यात आली.

येथील अवैध धंदे,ट्रॅफिक व्यवस्था, कंपन्यांची ट्रक वाहन व्यवस्था विषयी चर्चा करण्यात आली सोबतच पक्षाच्या कामात काही अडी अडचणी आल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन ठाणेदार वाघमारे यांनी दिले .शहरात शांतता सुव्यवस्था राखण्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करण्याची विनंती ठाणेदार यांनी केली. यावेळी तालुका अध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल गनी,महामंत्री शोएब जीलानी,मेनू बेग,सय्यद तोसिफ,शेख सलीम,हनीफ भाई, आणि अन्य सदस्य हजर होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये