स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पूर्वतयारी म्हणजेच भाजपा सदस्य नोंदणी अभियान
प्रा. अतुलभाऊ देशकर, माजी आमदार ब्रम्हपूरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
भारतीय जनता पक्षातर्फे संघटन पर्व अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियान देशभरात सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मान. हरीशजी शर्मा भाजपा जिल्हाध्यक्ष आणि या अभियानाचे जिल्हा प्रभारी मान.संजयजी गजपुरे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यामध्ये सदस्यता नोंदणीचे उल्लेखनीय कार्य सुरू आहे. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात देखील या क्षेत्राचे अतिशय कर्तव्य तत्पर लोकप्रिय माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी या अभियानाची सर्वस्वी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन पक्षाने दिलेल्या उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करीत आहेत.
ग्रामीण भागातील मौजा आवळगांव येथे गुरुबाबा देवस्थान त्रिवेणी संगमावर ब्रम्हपुरी तालुका सदस्यता कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत संबोधित करताना प्रा. अतुल देशकर यांनी प्रत्येक बुथवर किमान 200 सदस्य नोंदणीचे लक्ष्य अपेक्षित असुन भविष्यात कोणाला भाजपाच्या कोणत्याही कार्यकारिणीत स्थान मिळण्याकरिता,आपण केलेल्या सदस्य नोंदणी वर अवलंबून असणार असल्याचे पक्षाचे धोरण स्पष्ट केले. तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक उमेदवारांनी किमान 250 सदस्य नोंदणी अपेक्षित आहे. तरी हे उद्दिष्ट ठेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सदस्यता अभियान तालुक्यात राबविण्याचे आवाहन भाजपा ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार प्रा अतुलभाऊ देशकर यांनी केले आहे.
या बैठकीला विधानसभा प्रमुख प्रा.कादर शेख सर, तालुका अध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे,भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वंदनाताई शेंडे,माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर दादा सातपुते, सौ.कल्पनाताई नखाते माजी पंचायत समिती सदस्या,माजी पंचायत समिती सदस्य नीलकंठ मानापुरे, भाजयुमो जिल्हा महामंत्री तनय देशकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष अविनाश मस्के, सोशल मीडिया तालुका प्रमुख धीरज पाल, आदिवासी आघाडी तालुकाध्यक्ष राजेश्वर मगरे, जिल्हा सचिव माणिक पाटील थेरकर , सरपंच अनिल तिजारे,माजी सरपंच अभय कुथे, माजी सरपंच सुजित बालपांडे, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य विलास वाकुडकर ,विनोद नखाते, विलास डोंबळे, राजेंद्र राऊत, पुंडलिक पा. झोडे,कुमदेव लेनगुरे ग्रा.पं.सदस्य,ललिता ठाकरे चुमदेव जांभुळकर माजी उपसरपंच,इ.मान्यवर उपस्थित होते.
ही कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता आवळगांव येथील मनोहर सूर्यवंशी, केवळराम नरुले, देवनाथ लोळे, संदीप आष्टेकर, पिंटू भाऊ उर्फ केवळराम आंबोरकर यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन आणि आभार भाजपा महामंत्री प्रा.रामलाल महादेव दोनाडकर यांनी केले.