स्थानिक गुन्हे शाखा वर्धा कडून पो.स्टे. सावंगी मेघे हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये रेड
2 वेगवेगळ्या दारू विक्रेत्याकडून जू की 10 लाख 23 हजाराचा माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सविस्तर असे की, रोजी स्था. गुन्हे शाखा वर्धा द्वारे पो. स्टे. सावंगी मेघे हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई ची मोहीम राबवून प्रो. रेड केला असता नमूद दोन्ही ठिकाणी आरोपी मोक्यावरून मोहा दारू काढण्याकरिता लागणारा कच्चा मोहा रसायन सडवा तयार करण्याकरिता वेगवेगळ्या दोन ठिकाणी ठेवून असलेले एकूण 44 ड्रम तसेच भट्टीवर सुरू असलेले एकूण 8 ड्रम मिळून आले. एकुण जुमला किमंत 10,23,400 /- रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने मौक्का जप्ती पंचनाम्या प्रमाने जागीच जप्त करून व नाश करण्यात आला. पो. स्टे. सावंगी मेघे, येथे कमलेश काळे, रा . पांढरकवडा पारधी बेडा, वर्धा इंद्रपाल भोसले, रा . पांढरकवडा पारधी बेडा, वर्धा आरोपी विरुद्ध कलम 65 (B.C.E.F.), म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कारवाई पथक मा. पोलिस अधीक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पो.नि.विनोद चौधरी,यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनी. प्रकाश लसुंते, पो. हवा. नरेंद्र पाराशर, ना.पो.अं. नितीन इटकरे, सागर भोसले, पो.अं. संघसेन कांबळे, विकास मुंडे, सुगम चौधरी, मिथुन जिचकार सर्व स्था.गु.शा. वर्धा यांनी केली.