ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्कॉलर्स सर्च अकॅडमी, कोरपना येथे दुसरीतील विद्यार्थिनींनी दिली पहिली स्पर्धा परीक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना : स्कॉलर्स सर्च अकॅडमी, कोरपना येथे इयत्ता दुसरीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थिनींनी त्यांच्या जीवनातील पहिली स्पर्धा परीक्षा दिली. या विद्यार्थिनींनी ज्युनियर आयएएस (Jr. IAS) स्पर्धा परीक्षा उत्साहाने दिली असून, ही परीक्षा त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देणारी ठरणार आहे.

बालवयातच स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने नवनिर्मिती फाउन्डेशन लातुर द्वारा संस्कार ज्युनिअर आयएएस स्पर्धा परीक्षा वर्ग दुसरी ते सातवी करीता गेल्या दहा वर्षापासुन महाराष्ट्र भर आयोजित केली जाते, काल स्कॉलर्स सर्च अकॅडमी केंद्रावर १५९ विद्यार्थीनी परीक्षा दिली, परीक्षेसाठी विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थिनींच्या या स्पर्धेतील सहभागाचे कौतुक केले आहे.

या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, तर्कशक्ती, गणितीय क्षमता आणि वाचन कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली. त्यांना भविष्यात यश मिळो अशी शुभेच्छा दिल्या. आयोजन प्राचार्य राहुल उलमाले आणि या परीक्षेचे संयोजक प्राचार्य संजय ठावरी यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये