ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर सोनापूरच्या चिमुकल्या मुली आईच्या स्वाधीन

पोलीस व बाल संरक्षण विभागाच्या शोधकार्यास यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली पोलीस स्टेशन हद्दीतील सोनापूर येथील शिवण्या वय 8 वर्ष व यशिका वय 5 वर्ष या चिमुकल्या मुली वडिलासह 31 डिसेंबरपासून बेपत्ता होत्या. याबाबतची तक्रार सावली पोलीस स्टेशन व बाल संरक्षण विभागाला देण्यात आली. शोध कार्य सुरु असतांना पुणे जिल्ह्यातील बारामती येथे मुली आढळल्या. बारामती पोलीस व बाल संरक्षण विभागाच्या माध्यमातून दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन आईच्या स्वाधीन केले.

       सावली तालुक्यातील सोनापूर येथील मंगेश भांडेकर हा आपल्या चिमुकल्या मुली शिवण्या व यशीका यांना घेऊन 31 डिसेंबर रोजी फरार झाला. मंगेश हा नेहमी दारूच्या नशेत राहत असल्याने कुटुंबियांची चिंता वाढली. मंगेश दारूच्या नशेत पत्नी, आई, वडील यांना अनेकदा मारहाण करीत असे. त्यामुळे मागील एक वर्षांपासून पत्नी आशा मंगेश भांडेकर ही चामोर्शी तालुक्यातील दोटकुली येथे मुलींसह माहेरी राहत होती.

मात्र मोठ्या मुलीची शाळा असल्याने ती आजी आजोबाकडे सोनापूर येथे राहत होती. आई रोवणीच्या कामाला तेलंगणा येथे गेली असता लहान मुलीला घेऊन आला व 31 डिसेंबरला दोन्ही मुलींना घेऊन बेपत्ता झाला आहे. सुरुवातीला आजी आजोबा यांनी सावली पोलीस स्टेशन व आई आशा मंगेश भांडेकर हिने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालयात सदर तक्रार दिली.

बाल संरक्षण विभागातही ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली. सावली पोलीस स्टेशनचे हवालदार संजय शुक्ला यांचेकडे तपास होता तर सोबतीला चंद्रशेखर गम्पलवार,सतीश वाघमारे हे पोलीस शिपाई होते त्यांनी मिसिंग तक्रार दाखल केली व शोध सुरु केला. चंद्रपूर बाल संरक्षण विभागाचे प्रमुख अजय साखरकर यांनीही प्रयत्न सुरु केले. अखेर बारामती येथे एका ठिकाणी वडिलासह मुली मिळून आल्या. बारामती पोलीस व पुणे बाल संरक्षण विभाग यांनी मुली ताब्यात घेऊन पुणे येथे पोलीस शिपाई सतीश वाघमारे यांचे समक्ष आई आशा भांडेकर व नातेवाईकाच्या ताब्यात दिले.अखेर प्रशासनाच्या शोधकार्याला यश आलेले आहे.

     माझ्या दोन्ही मुलीच्या कानातील सोन्याचे रिंग वडिलांनी विकले आहेत पण मला मुली परत मिळाल्याने आनंदी आहे. या कामात सावली पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार, सावली पोलीस स्टेशनची फार मदत मिळाली आहे.

आशा भांडेकर, चिमुकल्याची आई

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये