संकष्टी चतुर्थी निमित्त पुरातन वरदविनायक मंदिरात भाविकांची गर्दी
हजारो भाविकांनी घेतले वरद विनायकाचे दर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
संकष्टी चतुर्थीची औचीत्य साधत भाविकांनी विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या एतेहासिक भद्रावती शहरातील गवराळा येथील वरदविनायक मंदिरात मोठी गर्दी केली. हजारो गणेश भक्तांनी आज वरद विनायकाचे दर्शन घेतले. यावेळी संकष्टी चतुर्थी ही रविवारी आल्यामुळे भाविकांची नेहमीपेक्षा मंदिरात जास्त वर्दळ होती. सकाळी श्री गणेशाची आरती पार पडल्यानंतर मंदिर दर्शनासाठी भाविकांकरिता खुले करण्यात आले.
अनेक गणेश भक्तांनी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधत मंदिरात श्री गणेशाचा अभिषेक केला. शहरातील वरद विनायक मंदिर हे विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असून ते अत्यंत पुरातन आहे. सदर वरद विनायक हा जागृत असून तो नवसाला पावणारा असल्याची मान्यता असल्यामुळे या मंदिरात श्री गणेशाच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक येथे येत असतात.