ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एटीएम ची बदली करून ए.टी.एम मधुन पैसे विड्राल करून फसवणुक करणारे गुन्हेगार अटकेत

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

गुन्हेगाराना 24 तासाचे आत अटक करून त्यांचे कडुन नगदी 61,500 गुन्हयात वारलेली बुलेट 2,50,000 असा एकुन 3,36,500 रु. चा माल जप्त करून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील 02 व जिल्हयातील 03 असे एकन 5 गुन्हे उघड अश्या प्रकारचे गुन्हे उघड व इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

दिनाक 11/02/2025 रोजी फिर्यादी विजय पांडुरंग ढोबळे वय 55 वर्षे रा. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट हे त्याचे वडील नामे पांडुरंग ढोबळे यांना मिळणारे सेवावनिवृत्त चे पेशनचे पैसे काढण्याकरीता स्टेट बैंक शाखा हिंगणघाट येथे गेले असता अज्ञात आरोपीने फिर्यादीस मैया पैसे जल्दी निकालो असे म्हणुन पैसे काढुन देण्याचा बाहाण करून पिनकोड नंबर प्राप्त करून फिर्यादीचे हातातील ए.टी.एम ची हातबलाखीने अदलाबदली करून ए.टी.एम घेवुन गेला व फिर्यादी यांचे वडीलांचे बैंक खात्यातुन एटीएम व्दारे 40,000 रू विड्राल करून फिर्यादी यांची फसवणुक केली अश्या फिर्यादी याचे रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप क 232/2025 कलम 318(4) भा.न्या.स अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

या अगोदर सुदा अश्याच प्रकारचे गुन्हे पो.स्टे ला व जिल्हयात इतरत्र होत असल्याने सदर गुन्हे उघकीस आनुन अज्ञात आरोपीचा शोध घेणे करीता मा. पो.नि श्री गभने सा यांनी आदेशीत केल्याने सदर गुन्हयाचे तपासामध्ये पोहवा नरेंद्र डहाके ब.न 110, जगदिश चव्हाण ब.न 1309 नापोशि विशाल बंगाले 1514 पोशि आकाश कांबळे ब.न 1517 यांनी फुटेजचे सुक्षम तात्रीक निरक्षण करून सपोनि श्री घनश्याम पाटील, पोउनि लक्ष्मीकांत दुर्गे, पोउनि प्रदिप कोल्हे, पोशि अमोल आहे बन यांचे सह सदर गुन्हयातील आरोपी नामे 1) मयुर अनिल कायरकर वय 33 वर्षे रा. विश्वकर्मा नगर गल्ली के 4 नागपुर ह.मु टाटा नगर बेसा रोड नागपुर 2) अभिजीत अनिल गुन्हाणे वय 33 वर्षे रा. श्रीराम नगर दिघोरी रोड उमरेड रोड नागपुर यांना मोठ्या शिताफिने त्यांचे राहते घरून त्यांना ताब्यात घेवुन सोबतच पो.स्टे हिंगणघाट येथे दिनांक 11/12/2024 रोजी घडलेल्या घटने बाबत फिर्यादी यांनी दिनाक 21/12/2024 रोजी दिलेल्या तकारी वरून पो.स्टे हिंगणघाट येथे अप कं. 1686/2024 कलम 318(4) भा.न्या.स गुन्हा नोंद असुन नगदी 39,000 रू ची अश्याच प्रकारे फसवनुक केल्याचे दोन गुन्हयातील मृद्देमाल आरोपीतांकडुन नगदी 61,500/-रु गुन्हयात वारलेली रॉयल इनफिल्ड बुलेट गाडी कं.एम एच 49 सी. ई 7072 किंमत 2,5000/-रू व दोन मोबाईल किमंत 25,000/-रू असा एकुन जु. की. 3,36,500 रु. चा माल जप्त करण्यात आले असुन पो. स्टे हिंगणघाट येथील दोन गुन्हे उघडकीस आनले तसेच वर्धा जिल्हयातील पोलीस स्टेशन सेलु, वर्धा येथील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे असे एकुन 5 गुन्हे उघडकीस आनले आहे. व जिल्हयातील ईतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कार्यवाही ही मा. श्री. अनुराग जैन पोलीस अधिक्षक साहेब, वर्धा. मा. डॉ सागर रतन कपडे, अपर पोलीस अधिक्षक, वर्धा, मा. श्री. रोशन पंडीत उपविभागीय पोलीस अधिकारी सा. हिंगणघाट, मनोज गभने, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात घनश्याम पाटील सहा. पोलीस निरीक्षक हिंगणघाट, तसेच पोउपनि लक्ष्मीकांत दुर्गे पोउपनि प्रदिप कोल्हे पोहवा नरेंद्र डहाके ब.न 110, पो.हवा जगदिश चव्हाण ब.न 1309 नापोशि विशाल बंगाले 1514 पोशि आकाश कांबळे ब.न 1517 अमोल आडे ब.न 1710 यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये