विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे मनमंदिर स्वच्छता अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल भद्रावती तर्फे मनमंदिर स्वच्छता अभियान अंतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करून भद्रावतील पर्यटन नगरी मधील विविध धार्मिक स्थळावर आज मन स्वच्छता मोहीम राबवण्यात आली हा उपक्रम राब विण्याचा मागचा मुख्य उद्देश म्हणजे भद्रावती मध्ये राष्ट्र, देश, वीदेशातून पर्यटक या भद्रावती पर्यटन नगरी येत असून भेट देत असतात परंतु काही पर्यटन व धार्मिक स्थळांमध्ये अशी काही विचलित करणारे दृश्य, अशलीत चाळे करीत असताना प्रेमी युगल दिसत असतात व मधपान तसेच धूम्रपान करीत असतात ज्यामुळे या आपल्या भद्रावती मधील पर्यटन नगरीतील विविध जाती पंथाच्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळातील धार्मिक स्थळाचा पूर्णपणे पर्यटकांना आनंद घेता येत नाही.
यासाठी आज 14 फरवरी 2025 रोजी ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची कृती होत असते अशा प्रत्येक स्थळाला भेट देऊन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या मार्फत निषेध करण्यात आला व यानंतर भद्रावतीतील अशा कोणत्याही पर्यटन स्थळ अथवा धार्मिक स्थळावर असे कृत्य करतानी कोणी दिसले व ज्यामुळे या पर्यटन व धार्मिक स्थळांची विटंबना होईल अशी कोणतीही कृती करताना आढळल्यास, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल आपला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. विनाकारण दुसऱ्यांना त्रास होईल अशे कोणतेही कृत्य करू नये ज्यामुळे समाजातील लोकांना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी व या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोक जनजागृतीसाठी या बाईक रॅली मधून घोषना करण्यात आल्या.
यासाठी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष विक्रांत राजेश बिसेन यांनी सर्वानुमते आपले मत व्यक्त केले व या साठी विश्व हिंदू परिषद चे व बजरंग दलचे कार्यकर्ते आयोजक संयोजक अभिषेक जी बोथलक, अर्जुन लांजेकर, सुरज पेंदाम, वेदांत भटारकर, क्षितिज कामतकर,नेहाल बांदुलकर, राज हूरकट, तसेच विविध संघटनाचे कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले व सगळ्यांच्या मार्फत अशा कृती करणाऱ्या व धार्मिक स्थळांची विटंबना करणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या व्यक्तिमत्त्वाचा घोषणेच्या माध्यमातून निषेध करण्यात आला.