ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वेकोली वणी क्षेत्रात ओबीसी कोल कर्मचारी कल्याण संघटनेची नवी कार्यकारिणी गठीत

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपूर) : संसदीय मागासवर्गीय आयोगाच्या निर्देशानुसार, वेकोलीच्या वणी क्षेत्रामध्ये ओबीसी कोल कर्मचारी कल्याण संघटनेची नवी कार्यकारिणी नुकतीच वेकोलीचे महासचिव राकेश कडू यांच्या अध्यक्षतेखाली क्षेत्रीय कार्यालयात पार पडली. या बैठकीत सर्वानुमते संकेत खोकले यांची अध्यक्षपदी तर गणेश रोडे यांची सचिवपदी निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीमध्ये पुढील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे:

अध्यक्ष : संकेत खोकले, उपाध्यक्ष : रोशन जोगी, नगाजी झाडे, सचिव : गणेश रोडे, सहसचिव : जीवन मते, कोषाध्यक्ष : राजीव कुंडले, मीडिया प्रभारी : सुनील बिपटे.

सदस्य म्हणून : शरद ठाकरे, अजय मिलमिले, दीपक झाडे, योगेश कोल्हेकर, आनंद येसेकर, अक्षय कैरासे, निलेश पिंपळकर, मंगेश भोयर यांचा समावेश करण्यात आला आहे.

ही कार्यकारिणी वेकोलीच्या ओबीसी कामगारांच्या हितासाठी व कल्याणासाठी कार्यरत राहणार आहे. नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे वेकोली मुख्यालयाचे अध्यक्ष चेतन सेलोकर, नागपूर क्षेत्र अध्यक्ष जितेंद्र, घुग्घुस सबएरिया अध्यक्ष घनश्याम कुटेमाटे यांच्यासह प्रशांत डोये, कचरू तपासे, प्रवीण झाडे, नितीन बदखल, राजकुमार सावे, अनुप हेपट, धीरज दोडके आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये