जिल्हा सामान्य रुग्णालयातील गैरव्यवहार प्रकरणी गृह विभागाने दिले लाचलुचपत विभागाला चौकशीचे पत्र
लाच लुचपत विभागाच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आरोग्य विभागाला दिले होते पत्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा मध्ये संबंधित गैरअर्जदार लोकसेवकांनी साहित्य व उपकरणे खरेदी विक्री प्रक्रियेत केलेल्या आर्थिक गैरवहार प्रकरणी आणि अपराधाची उघड चौकशी होउन भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 17 अ प्रमाणे कार्यवाहीसाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांनी यापूर्वी आरोग्य विभागाचे अवर सचिव यांना पत्र देऊन सक्षम अधिकारी यांचे कडून रितसर तक्रार दाखल करण्याचे पत्र देण्यात आले होते त्यानंतर दिनांक 7 फेब्रुवारी रोजी राज्याच्या गृह विभागाकडून महासंचालक लाचलुचपत विभागाला पत्र देऊन याविषयीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील या प्रकरणात दोशी असलेल्या अधिकारी कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहे कोणत्याही क्षणी फौजदारी कार्यवाहीचा बडगा या महाभागावर उभारू शकतो.
याबाबत सविस्तर असे की जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी वेळोवेळी जे जे साहित्य खरेदी करण्यात आले त्यामध्ये अनियमित्ता होऊन भ्रष्टाचार झाल्याची तक्रार पुराव्यानिशी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी राज्याच्या आरोग्य विभागाकडे केल्यानंतर सलग चार वर्षे चौकशीनंतर सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील अधिकारी व कर्मचारी दोषी असल्याचे समोर आल्यानंतर या अधिकारी कर्मचारी यांचे विरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कार्यवाही करावी असे पत्र परत चंद्रकांत खरात यांनी दिल्यावरून लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांनी आरोग्य विभागाला पत्र देऊन या प्रकरणात सविस्तर तक्रार दाखल करण्याचे सुचवीले या पत्रानंतर राज्याचे गृह विभागाकडून दिनांक सात फेब्रुवारी 25 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांना पत्र देऊन याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे कळविण्यात आले आहे.
या पत्रानंतर व चौकशीनंतर कोणाच्याही क्षणी संबंधित दोषी अधिकारी कर्मचारी यांचे विरोधात फौजदारी कार्य होऊन त्यांनी कमावलेल्या अप संपत्तीची सुद्धा जप्ती होऊ शकते.