नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवुन फसवणुक करणारे आरोपी सायबर पोलीसांच्या जाळयात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 14/02/2025 रोजी फिर्यादी ही घरी हजर असताना फिर्यादी सुरज धनराज जोध रा. आष्टी यांनी त्यांचे मोबाईलवर Naukri.com येथे महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीमध्ये जी.टी. इंजीनिअर या पदाच्या जागा रिक्त असल्याची जाहिरात पाहिली व नोकरीकरीता अप्लाय केला त्यासंबंधाने फिर्यादी यांना कॉल आला व आपल्याला मुलाखातीकरीता मेल प्राप्त होईल त्याकरीता फिर्यादी यांना वेगवेगळ्या कारणास्तव एकुण 1.38.450/-रु भरायला सांगुन नोकरी संबंधाने फसवणुक केली. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरुन दिनांक 12/11/2024 रोजी सायबर पोलीस स्टेशन येथे अप क्र. 40/2024 कलम 318 (4) 319 (2) सहकलम 66 (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचा सुपर्ण तांत्रीक पद्धतीने तपास केला असता तांत्रीक बाबीचे विष्लेशन करून सदरचे आरोपी हे बिहार राज्यातील असुन सद्या वाराणसी, उत्तर प्रदेश येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले.
मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे आदेशान्वये सायबर पो.स्टे मार्फत एक पथक तयार करुन दिनांक 03/02/2025 रोजी सदरचे पथक हे वाराणासी, उत्तर प्रदेश व पटना, बिहार येथे रवाना झाले. सदर पथकाने सतत 4 दिवस आरोपीतांची तांत्रीक व गोपनीय पद्धतीने माहिती काढून आरोपीतांना निष्पन्न करुन सदरचे आरोपी हे 5 खोल्यांचे घर किरायाने घेऊन तेथुन संपूर्ण भारतभर फसवणुकिचे गुन्हे करत होते. सदर घरावर छापा टाकला असता आरोपी नामे 1) कुमार कुमार मदनमुरारी सिंह वय 33 वर्ष रा. कुरील, पटना, बिहार 2) रोशनकुमार अखिलेशकुमार सिंह वय 30 वर्ष रा. पटेल नगर, पटना, बिहार दोन्ही सधा शांतीनगर कॉलोनी वाराणासी, उत्तर प्रदेश है लोकांची फसवणुक करत असताना रंगेहात मिळून आले. सदर आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातुन 1 नोटपेंड, 8 मोबाईल, 3 लॅपटॉप, 3 एटीएम कार्ड व नगदी 1,19.000/-रु असा एकूण 242.000/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन गुन्हा उघडकिस आणला. आरोपीतांकडुन महाराष्ट्रासह इतर राज्यातील गुन्हे उघड झाले असुन आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सायबर पोलीस स्टेशन वर्धा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात व निर्देशाप्रमाणे पो.उप.नि. प्रकाश लसुंते, पोलीस अंमलदार निलेश तेलराधे, दिनेश बोथकर, वैभव कट्टोजवार, अमित शुक्ला, अनुप कावळे, रंजीत जाधव अनुप राऊत, प्रतिक बांदीले, पवन झाडे, मपोशि लेखा राठोड, आरती पारीसे सर्व सायबर पोलीस स्टेशन वर्धा यांनी केली.