घरफोडी करणारे चोरटे सेवाग्राम पोलीसांच्या ताब्यात तिन गुन्हे उघड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
फिर्यादी पायल गुलाबराव भोगे रा.अंबरकर ले आऊट वरुड ता.जि.वर्धा यांनी दि.11/02/2025 रोजी पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे तक्रार दिली की, त्यांचा भाऊ पराग भोगे हा त्याचे घराला लॉक लावुन परीवारासह बाहेरगावी गेला असतांना अज्ञात आरोपीतांनी दिनांक 10/02/2025 ते दिनांक 11/02/2025 च्या रात्रदरम्यान घराचे कुलुप तोडून आत प्रवेश करून बेडरूमधिल लोखंडी कपाटातुन नगदी रक्कम 5000/- रू., वुलनचे जर्कींन एक सॅमसंग कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल एक नोकीया कंपनीचा साधा छोटा मोबाईल असा एकुण किंमत 11,700/- रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला अश्या फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्ह्याची तात्काळ दखल गुन्हे प्रकटीकरण पथकाने घेवून पो. स्टे. परिसरात गुप्त बातमीदार नेमुन गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहिती नुसार आरोपी 1)मामुन उर्फ राजा रशिद फारूकी वय 42 वर्ष रा. फारूकी मंजील 13/59 हवालदारपुरा ठाकरे मार्केटजवळ, वर्धा 2) देवाशिश मेघनाथ सरकार वय 41 वर्ष रा. दमदम नागिरबजार, दिल्लीरोड (वेस्ट बंगाल)3)सम्यक अरूण धवणे वय 19 वर्ष रा. पिपरी(मेघे) ता.जि.वर्धा यांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी करण्याकरीता वापरलेले वाहन, साहीत्य व चोरी केलेले 5000/- रुपये नगदी, वुलनचे जर्कींन,एक सॅमसंग कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल,एक नोकीया कंपनीचासाधा छोटा मोबाईल जप्त केला तसेच नमुद आरोपीतांनी मौजा वरूड येथिल आणखी दोन घरी घरफोडी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून मोबाईल टॅब, दोन मोबाईल फोन, दोन हँन्ड वॉच, ट्रॉली बॅग, चांदीच्या तोरड्या,जोडवे बेंटेक्सचे हार ,नेकलेस बांगड्या रोख रक्कम 2000/-रू. जप्त करण्यात आली.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदर्शनात परि. पोलीस उपअधिक्षक तथा ठाणेदार पोलीस स्टेशन, सेवाग्राम श्रीमती प्रतिक्षा खेतमाळीस यांचे निर्देशाप्रमाणे स.फौ. विठ्ठल दुधकोहळे पो. हवा. हरिदास काकड, अजय वानखेडे, रमेश वाघ, मंगेश झामरे, सचिन सोनटक्के पो.ना. संजय लाडे, पो.शि. अभय इंगळे, प्रदिप कुचनकर, नेमणुक पोलीस स्टेशन सेवाग्राम यांनी केली.