एकलव्य इंग्लिश स्कूल येथे क्षमता वृद्धी शिक्षक-प्रशिक्षण
शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
एकलव्य इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, बिबी येथे ‘प्रशिक्षण २.०’ या शिक्षक क्षमता वाढीच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी या प्रशिक्षणास विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले यांनी भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी शिक्षकांच्या अडचणी जाणून घेतल्या व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रशिक्षण आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी सचिनकुमार मालवी, प्राचार्य नितेश शेंडे, विकास भांडारवार, राजेश बोढे, विनोद नांदेकर, गिरीश पाझारे, रुपेश विरुटकर, अखिल अतकारे, अजय बारसागडे, गणेश लांडे, ज्योती मोरे, दिनेश साठे, कुरेंटीवार, प्रा. रवी झाडे आदींची उपस्थिती होती.
या प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांना आधुनिक अध्यापन पद्धती, तंत्रज्ञानाचा उपयोग आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन दृष्टिकोन मिळाला. प्रशिक्षण २.० उपक्रमाने शिक्षकांना प्रेरणा मिळाली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला.