गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदेशी दारूची वाहतुक करतांना वर्धा उपविभागीय पोलीस पथक यांची कार्यवाही

आरोपीच्या ताब्यातून एकुण किंमत 3 लाख ७६ हजारावर माल हस्तगत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, वर्धा येथे दिनांक 23/06/2023 रोजी कार्यालयीन कामकाज करीत असतांना मिळालेल्या खात्रीशीर खबरे वरून वर्धा उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांनी इंदीरा सुत गिरणी चे बाजुचे चितोडा रोडवर नाकेबंदी करून प्रोव्हीशन रेड केला असता मौक्यावरून आरोपी नामे 1) रणधिर चंद्रबल गौतम वय 52 वर्ष रा. वार्ड न. 2 चितोडा पोस्ट बोरगाव ता. जि. वर्धा 2) प्रविण राजेन्द्र सातपुते वय 38 वर्ष रा. वार्ड न. 6 सत्यदेव नगर, बोरगांव मेघे, चितोडा रोड, वर्धा हे विदेशी दारूची चारचाकी वाहनानी वाहतुक करतांना मिळुन आला त्यांचे ताब्यातुन 1) एक सिल्वर रंगाची सुजुकी कपनीची वॅगनौर कंपनीची चारचाकी वाहन क्रमांक एम.एच 31 सी. एन. 6482 अंदाजे किंमत 3,00,000/- 2) एका पुर्ण कागदी खरडयाचे खोक्यात व अर्ध्या लहान कागदी खरडयाचे खोक्यात 180 एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या रॉयल स्टॅग कंपनिच्या एकुन 72 शिश्या 3) एका पुर्ण कागदी खरडयाचे खोक्यात व अर्ध्या लहान कागदी खरडयाचे खोक्यात 180 एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चॉईस ब्लु कंपनिच्या एकुण 72 शिश्या 4) एका पुर्ण कागदी खरडयाचे खोक्यात व अर्ध्या लहान कागदी खरडयाचे खोक्यात 180 एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या ऑफीसर चॉईस कंपनिच्या एकुण 72 शिश्या 5) अर्ध्या लहान कागदी खरडयाचे खोक्यात 180 एम.एल. च्या विदेशी दारूने भरून असलेल्या मॅक डाव्हल्स कंपनिच्या एकुण 24 शिश्या 6) अर्ध्या लहान कागदी खरडयाचे खोक्यात 90 एम.एल. च्या देशी दारूने भरून असलेल्या टॅगो पंच कंपनिच्या एकुण 50 शिश्या 7) एक किपेंडवाला लावा कंपनीचा मोबाईल 1,000/-रू असा एकुण जु. किंमत 3,76,500/- रू. चा माल मिळुन आला आरोपीतांना सदरची देशी विदेशी दारू बाबत विचारपुस केली असता आरोपी दोन्ही यांनी सांगीतले की, नागपुर जिल्हातील वडगाव येथिल ग्रिन व्हिलेज बार मधुन आणला सदर बार चे मालक / चालक समीर जयस्वाल रा. नागपुर असे आहे. असे सांगीतल्यावर नागपुर जिल्हातील वडगाव येथिल ग्रिन व्हिलेज बार चे चालक / मालक समीर जयस्वाल रा. नागपुर यांनी त्यांचे बार परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हात दारूबंदी असल्यासबंधी माहीती असतांना सुध्दा वर्धा जिल्हातील आरोपी क्र. 1 व 2 यांना दारूचा माल देवुन त्यास सहकार्य केल्याने त्याचे कृत्य कलम 82. म.दा.का. प्रमाणे होत असल्याने पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे तीन्ही आरोपीतांविरूध्द अपराध क्रमांक 352 / 2023 कलम 65 (अ) (ई), 77 (अ) 82 83 म.दा.का अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. सेवाग्राम येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरूल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा. श्री आबुराव सोनवणे सा. याचे सुचनेप्रमाणे, तसेच पो.उप.नि परवेज खान, संजय गायकवाड यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे नापोशि. अमर लाखे, पो.शि. पवन निलेकर, समीर शेख, मंगेश चावरे, रवि नरूले, राजु वैध, संदीप अलोने, चेतन दुबे यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये