आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रविवारी हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब आजार विशेष योगा शिबिर

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर आणि माधवबाग ,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

चांदा ब्लास्ट

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर आणि माधवबाग ,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग, मधुमेह, ब्लॉकेजेस, उच्चरक्तदाब, थायरॉईड आणि लठ्ठपणा या आजारांना परतवून लावण्या करिता आणि आजार नियंत्रित करण्यासाठी विशेष शास्त्रोक्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.सदर शिबीर रविवार दिनांक 25/6/2023 रोजी सकाळी 6.30 वाजता स्थानिक विद्या विहार कॉन्व्हेन्ट,तूकुम चंद्रपूर इथे आयोजित करण्यात आले आहे.

या विशेष योग शिबिरात माधवबाग हॉस्पिटल चे योग प्रशिक्षक श्री निलेश ठाकरे यांच्या कडून उपस्थितांना मार्गदर्शन आणि योग सराव करून घेण्यात येणार आहे.

करिता या विशेष योग शिबिरात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे व जीवनशैली च्या आजारातून मुक्त होण्यासाठी च्या उपयुक्त योगाभ्यास व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर चे अध्यक्ष रोटे.अजय जयस्वाल तथा सचिव रोटे.संतोष तेलंग व माधवबाग चंद्रपूर चे संचालक डॉ लक्ष्मीनारायण सरबेरे आणि डॉ प्रिती सरबेरे यांनी एका संयुक्त पत्रका द्वारे केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये