जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक, वर्धा यांची अवैध दारु विक्रेते यांचे विरुध्द बेधडक मोहीम
पोलीस स्टेशन अल्लीपुर येथील अवैध हातभट्टी दारु विक्रेत्यास एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत नागपुर कारागृहात रवानगी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन अल्लीपुर, जि. वर्धा अंतर्गत मौजा कानगाव परिसरात अवैधरित्या हातभट्टीची गावठी मोहा फुला पासुन निमीत दारु विक्री करणारी महोला नामे अंजु ऊर्फ अंजना प्रमोद वाघमारे, वय ४७ वर्ष राह. कानगाव ता. हिंगणघाट जि. वर्धा हिचे विरुध्द पोलीस स्टेशन अल्लीपुर, जि. वर्धा येथे सन २०२१ ते २०२४ पावेतो महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत एकुण २७ गुन्हे दाखल आहेत. स्थानबध्द महीले विरुध्द वेळोवेळी प्रचलीत कायदयान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती. परंतु अशा प्रतिबंधक कार्यवाहीस सदरहु स्थानबध्द महीला ही न जुमानता अवैधरीत्या गावठी मोहा फुलाच्या हातभट्टीच्या तसेच देशी दारुची विक्री करीत होता. ज्यामुळे पोलीस स्टेशन, अल्लीपुर अंतर्गत येत असलेल्या कानगाव परिसरातील सार्वजनीक स्वास्थास धोका निर्माण होवुन सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था बाधीत झाली होती. तसेच पोलीस स्टेशन, अल्लीपुर परिक्षेत्रातील कानगाव तसेच आजु बाजुचे खेडे गावातील मोठया प्रमाणात मद्दपी लोकांचा जनसामान्यांना तसेच महीला मुलींना खुप त्रास वाढत चालला होता.
ठाणे प्रभारी अधिकारी सपोनी/प्रफुल डाहुले, यांनी एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. अनुराग जैन यांचे मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मथी सी. यांना सादर केला होता. त्याअनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा यांनी दिनांक ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन तिला नागपुर मध्यवती कारागृहात, नागपुर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
आगामी येणारे सण उत्सव निर्भीड व शांतता पुर्ण वातावरणात पार पाडण्याचे उददेशाने अशा अवैधरीत्या दारु विक्रेत्यावर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्याकरीता पुरवठा करणाऱ्या दारु विक्रेत्यावर तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तीवर एम.पी.डी.ए. कायदयांर्तगत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मधी सी., तसेच मा. पोलीस अधिक्षक वर्धा श्री. अनुराग जैन, यांनी दिलेले आहेत.
सन २०२४ साली आज पावेतो एकुण १९ दारु विक्रते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायदयांर्तगत जैल मध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. तसेच सन २०२५ मध्ये अद्याप पावेतो ०३ अवैध दारु विक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्तीची जेल मध्ये रवानगी करण्यात आलेली आहे.
मा. जिल्हाधिकारी, वर्धा व मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे बेधडक मोहीमेमुळे अवैध दारु विक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्ती मध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.
सदरची कार्यवाही मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा, डॉ. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, श्री. राहुल चव्हाण, उप विभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव, पोनी/विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शना खाली सपोनी/पंकज वाघोडे, पोहवा/अमोल आत्राम, पोहवा/ आशिष महेशगौरी, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, व सपोनी/प्रफुल डाहुले, पोलीस अंमलदार/रवि वर्मा, पोलीस स्टेशन, अल्लीपुर, यांनी केली आहे.