ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पो.स्टे. तळेगाव (शा.प) हद्दीत जुगार कायद्यान्वये रेड

आरोपीच्या ताब्यातून 30 हजारांवर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा द्वारे उपविभाग आर्वी हद्दीत पो. स्टे. तळेगाव येथे अवैध धंद्यावर कारवाई करिता पेट्रोलिंग करीत असताना मुखबीर कडून मिळालेल्या माहितीवरून यातील नमूद आरोपीवर जुगार रेड केला असता आरोपी सार्वजनिक ठिकाणी सट्टा पट्टीचा जुगार खेळताना रंगेहात मिळून आल्याने पंचा समक्ष आरोपीचे ताब्यातुन वरीलप्रमाणे जु. की.30,945/- रू चा मुद्देमाल मिळून आल्याने तो मोक्यावर जप्त केला. वरून पो.स्टे. तळेगाव येथे उपकारसिंग तेजनसिंग बावरी , वय 29 वर्ष, रा:- शिखबेडा तळेगाव , ता. आष्टी जि. वर्धा  आरोपी विरुध्द कलम 12(अ) म.जु.का. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कारवाई पथक मा. पोलिस अधीक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पो.नि.विनोद चौधरी,यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. नरेंद्र पाराशर, ना.पो.अं. नितीन इटकरे, सागर भोसले, पो.अं. संघसेन कांबळे, मिथुन जिचकार सर्व स्था.गु.शा. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये