Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

बाल संगोपन योजनेत संस्थेकडून आर्थिक लूट

लाभार्थी बालक व महिलांची संस्थेच्या कार्यालयावर धडक

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली – अनाथ व एकल पालकांच्या मुलांच्या संगोपन व शिक्षणासाठी मदत व्हावी याकरीता महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आर्थिक सहाय्याची योजना आहे. या योजनेच्या अंमलबजावणी करीता तालुका स्तरावर स्वयंसेवी संस्थेला काम देण्यात आले आहे मात्र किरण फाउंडेशन चंद्रपूर ही संस्था लाभार्थ्यांकडून प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये वसुल करीत असल्याने लाभार्थी मुलांचा व महिलांचा मोर्चा संस्थेच्या कार्याल्यावर धडक देत कारवाईची मागणी केली.

         महिला व बाल विकास विभाग अंतर्गत ० ते १८ वयोगटातील अनाथ, निराश्रीत, एकपालक, आजाराने ग्रस्त, एचआयव्ही, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील पात्र लाभार्थी बालकांना 2250 रुपये दरमहा देण्यात येत असून सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी बालकांना जिल्हास्तरीय कार्यालयात जावे लागत होते.

बालकांना गैरसोय होवू नये व सदर योजनेचा काम सुरळीत पार पाडण्याकरिता शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता प्रत्येक जिल्हयात जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय यांच्या नियंत्रणात तालुक्याच्या ठिकाणी लाभार्थ्यांचे आधार सिडींगसाठी स्वयंसेवी संस्थेची निवड करण्यात आली आहे. सावली तालुक्यात हे काम किरण फाउंडेशन चंद्रपूर या स्वयंसेवी संस्थेला देण्यात आले आहे मात्र या संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून योजनेचे लाभ मंजूर करण्यासाठी, मंजूर लाभ सुरु ठेवण्यासाठी लाभार्थ्यांकडून दरमहा एक हजार रुपये वसुल केल्या जात आहे.

लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पैसे मागण्या इतपत हिंमत करीत असल्याने योजना बंद करतील या भीतीपोटी महिलांनी पैसेही दिले. पण पैशासाठी तगादा लावत असल्याने बालक व महिलांनी माजी सभापती विजय कोरेवार, नगराध्यक्ष लताताई लाकडे, काँग्रेस शहराध्यक्ष विजय मुत्यालवार यांचे नेतृत्वात संस्थेच्या कार्याल्यावर धडक दिली. मात्र महिला येणार असल्याची भनक लागल्याने कार्यालयास कुलूप लावले होते.

यावेळी कोणीही पैशाची मागणी केल्यास जिल्हा कार्यालयात तक्रार करावी असा कार्यालयावर सूचना फलक लावून निषेध केला व किरण फाउंडेशन या संस्थेवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन संरक्षण अधिकारी भसारकर यांचे मार्फतीने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे निवेदन देण्यात आले. यावेळी मिथुन बाबनवाडे, मोहन गाडेवार, नगरसेवक प्रफुल वाळके, प्रवीण गेडाम व शेकडो महिला व मुले सहभागी होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये