Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सेतु केंद्र चालकांच्या समस्येबाबत तहसीलदारांना निवेदन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यांतील सेतु केंद्र संचालकांच्या विविध प्रकारच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी तालुकास्तरीय महा ई सेवा केंद्र संघटना, देऊळगाव राजा च्या वतीने तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना देण्यात आले, तालुक्यांतील महा ई सेवा केंद्र संचालक महा ऑन लाईन पोर्टल च्या माध्यमातुन गोरगरीब जनतेला राज्य शासनाच्या विविध योजना, ग्रामीण व शहरी भागात पोहचविण्याचे कामगेल्या अनेक वर्षापासून करत आहे.

परंतु त्या सुविधा देत असताना शासनाने नुकताच महा ऑन लाईन पोर्टल हे फक्त एकाच सिस्टिमवर राबविण्याचा निर्णय घेतला आहे, व त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू केली आहे, परंतु एका सिस्टिमवर कामे होणे अशक्य असुन अनेक अडचणी येत आहेत. लाईन नसणे, नेट वर्क नसणे, या सारख्या तांत्रिक अडचणी येतात, सर्व केंद्र संचालकांना जनरेटर घेणे शक्य नाही, तेव्हा शासनाचे किमान दोन सिस्टिमवर महा ऑन लाईन पोर्टल चालविण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरून शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांच्या कामाला गति मिळेल अशी मागणी केली आहे.

शासनाचे नुकतेच प्रत्येक शाळा, महाविद्यालयात महा ऑन लाईन ची आय डी देण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे सर्व व्ही एल ई केन्द्र संचालकांवर उपासमारीची पाळी येणार आहे, तरी शासनाने घोषीत केलेल्या अटीला तूर्तास स्थगिती देण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब कासारे, उपाध्यक्ष अहमद खान शफी अहमद खान, सचिव संतोष डोंगरे, सहसाचिव संतोष कासारे, कोषाध्यक्ष प्रणय कोरडे, तथा इतर सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये