ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषी उत्पन्न बाजार समिती ने शेतकऱ्यासाठी सुरू केली मोफत फार्मर आयडी सुविधा 

शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : सभापती समाधान शिंगणे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कृषी उत्पन्न बाजार समिती देऊळगाव राजा येथे बाजार समितीच्या कार्य क्षेत्रातील व परिसरातील शेतकरी बांधवासाठी मोफत फार्मर आयडी तयार करण्याची सुविधा माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या संकल्पनेतून सुरू केली आहे.

यापुढे शेतकरी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घ्यावयाचा असेल किवा शासनाकडून अनुदान घ्यावयाचे असल्यास वैयक्तिक फार्मर आयडी असणे बंधनकारक केले आहे. म्हणून बाजार समितीच्या वतीने कार्यक्षेत्रातील व परिसरातील शेतकरी बांधवांना लाभ मिळावा या उद्देशाने समितीच्या संचालक मंडळाने विनामुल्य व विना खर्च फार्मर आयडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. फार्मर आयडी बनविण्यासाठी आधार कार्ड, आधार कार्ड शी लिंक असलेला मोबाईल सोबत आणणे , स्वतःच्या मालकीचे सात बारा ची प्रत आणणे आवश्यक आहे.

देऊळगाव राजा व येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात तसेच देऊळगाव मही येथील छत्रपती बिगर शेती सहकारी पतसंस्था येथे फार्मर आयडी तयार करण्यात येत आहे तेव्हा शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे व उप सभापती दादाराव खार्डे व संपूर्ण संचालक मंडळाने केले आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये