पोलीस असण्याची बतावणी करत दीड लाखाणी गंडवीले
७७ वर्षीय वृद्धाला फसविले : नाग मंदिर परिसरातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
आम्ही पोलीस आहोत तुम्ही सोन्याच्या वस्तू कशाला घातल्या या सुरक्षित ठेवून द्या असे म्हणत ७७ वर्षीय वृद्धाला दुचाकीवरून आलेल्या चौघांनी म्हटले व त्यांची जवळी सोन्याच्या वस्तू २९ ग्रम किंमत अंदाजे दीड लाखांनी गंडविले. हि घटना आज दिनांक ८ रोज शनिवारला ११ वाजता नाग मंदिर परिसरात घडली
मधुकर पांडुरंग दिवसे वय ७७ वर्षे राहणार गौतम नगर पेट्रोल पंप जवळ भद्रावती असे फिर्यादी वृद्धाचे नाव आहे दिवसे हे नेहमीप्रमाणे नाग मंदिर येथे दर्शना साठी अकरा वाजता निघाले होते त्यादरम्यान दोन मोटरसायकलवर चौघेजण गाडीचा पाठला करत लोकमान्य विद्यालयासमोर आले व मधुकर दिवसे यांना दुचाकी ने जात असताना थांबविले आम्ही पोलीस आहोत असे म्हणत त्यांनी आपले आयकार्ड दाखविले व तुमच्या गळ्यात सोण्याचा गोप हातात अंगठी आहे तुम्ही बिंदास्त फिरून राहिलात कालच चंद्रपूरात हत्या झाली.
अनुचित प्रकार घडू नये याकरता तुम्ही सोन्याच्या वस्तू काढून तुमच्याच गाडीच्या डिक्कीत ठेवा तसेच त्यांच्या सहकार्यासाठी आलेल्या एका गाडी चालकाला सुद्धा त्यांनी तसाच दम दिला. तुमच्या वस्तू गाडीच्या डिक्कीत ठेवलाय असे म्हणत ते चौघेजण निघून गेले या घटनेनंतर मधुकर दिवसे यांना या प्रकाराबाबत शंका आली व त्यांनी आपल्या गाडीच्या डिकी उघडून पाहिली असता त्यात त्यांच्या सोन्याच्या वस्तू दिसल्या नाहीत आपल्याशी फसगत झाल्याचे कळले यानंतर त्यांनी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली.
या घटनेचा दुखात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही वरून पूटेज मागितले आहे व गुन्हे अन्वेषण विभाग अज्ञात आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती ठाणेदार लता वाडीवे यांनी दिली.