ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बाळकृष्ण धांडे यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रातील सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता बाळकृष्ण धांडे यांचे काल, दिनांक १२ जून २०२५ रोजी वार्धक्याने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. गडचांदूर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूरचे माजी मानद सचिव श्री. विलासराव धांडे व संजय धांडे यांचे ते वडील होते.
बाळकृष्ण धांडे यांनी चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रात अधिक्षक अभियंता म्हणून आपली सेवा बजावली होती. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आणि गडचांदूर व तोहोगाव परिसरात त्यांचा विशेष आदर होता. त्यांचे मागे मुले, सुना, व नातवंडे आहेत.