ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वृक्षारोपण तसेच गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वितरण

सामाजिक कार्यकर्ते गणेश घोरमोडे यांनी साजरा केला वाढदिवस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

 मालडोंगरी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश घोरमोडे यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वेगवेगळ्या ५० प्रजातीचे झाडे शाळा परिसरात लावून तसेच गावातील गोरगरीब शालेयविद्यार्थी- विद्यार्थिनींना नोटबुक व पेनचे वितरण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

मालडोंगरी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश घोरमोडे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक दायित्व जोपासत आगळया- वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करीत आहेत. यंदाचा वाढदिवस त्यांनी मालडोंगरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील पटांगणात वृक्षारोपण करून व शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक पेनचे वितरण करून साजरा केला.

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभाकर शेलोकर, डॉ, राजेश कांबळे, नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती विलास विखार, माजी जिल्हा परिषद सदस्य क्रिष्णा सहारे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष सोनू नाकतोडे, किशोर राऊत सिद्धेश्वर भर्रे, ग्रामसेवक बबलू अलोणे, सरपंच मंजुषा ठाकरे, हिरालाल सहारे, उपसरपंच विनोद घोरमोडे, मुख्याध्यापक मस्के सर, ठाकरे सर, यांच्यासह अन्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये