ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

योगासनांचा आरोग्यावर सकारात्मक प्रभाव : डॉ. नितीन मेहेत्रे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त महाविद्यालयात व विविध खेड्यामध्ये योगा दिवस साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पांगरी, गिरोली खुर्द व समर्थ कृषी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ.नितीन मेहेत्रे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम एक पृथ्वी, एक आरोग्य याबद्दल माहिती दिली. निरोगी राहण्यासाठी रोजच्या दिनचर्यात थोडासा वेळ आपण आपल्या शरीरासाठी देणे गरजेचे आहे.

नियमित व्यायाम व योगासने प्राणायाम यांचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो करिता प्रत्येकाने योगासने करावी असे सांगितले. रासयो कार्यक्रमाधिकारी प्रा. अश्विनी जाधव यांनी भारतीय प्राचीन संस्कृती आणि परंपरा यामध्ये योग ध्यानधारणा ,योगासने व योगसाधना याचे महत्त्व आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच समावेश केला पाहिजे, जून महिन्याच्या २१ तारखेला सूर्य आपली स्थिती बदलतो म्हणजेच उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते हा एक नैसर्गिक बदल आहे.जेव्हा सूर्याचे दक्षिणाय सुरू होते तेव्हा सूर्याचा प्रकाश आणि उष्णता कमी होते.

यामुळे वातावरणात बदल होऊ लागतो यामुळे रोगांचे आणि आजारांचे उगमस्थान असलेले जीव जंतू आपलं काम करायला सुरुवात करतात आणि माणसं आजारी पडण्याचे प्रमाण वाढायला सुरुवात होते .योगासनांचा आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो यामुळे आपल्या शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी योग करणे गरजेचे आहे असे सांगितले. प्रा.योगेश चगदळे यांनी विविध योग आसनांची आणि प्राणायाम माहिती दिली. तसेच प्रा. विकास म्हस्के यांनी लोकांना योगाचा वापर करून अधिक जाणीवपूर्वक करून जगण्यास प्रोत्साहित करावे,जागृत राहावे व निसर्गाचा आदर करावा असे सांगितले.

सदर कार्यक्रमास प्रा.उषा जायभाये, प्रा. पवार,प्रा.शेळके, प्रा. सोळंकी, प्रा.नागरे सर्व कर्मचारी ग्रामस्थ, विद्यार्थी प्रतिनिधी, शाळेचे विद्यार्थी तसेच शिक्षक वृंद हजर होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये