अवैध रेती तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर जप्त – राजुरा पोलिसांची मोठी कारवाई
सहा आरोपींसह 24 लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
जिल्ह्यात सर्वत्र अवैध रेती उत्खनन व वाहतुक सुरू आहे. राजुरा पोलिसांनी मागील काही दिवसांपासून अवैध रेती तस्करांविरुद्ध मोहीम उघडली असुन मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी रात्रीचे वेळी केलेल्या धडक कारवाईत अवैध रेती वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर सह 24,12,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व सहा आरोपींना बेड्या ठोकल्या.
अधिकृत वृत्त असे की, 21/02/2025 रोजी रात्री गस्त सुरू असताना राजुरा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, वर्धा नदीच्या कोलगाव घाटावरून रेतीची चोरी करुन तीन ट्रॅक्टर सास्ती गावचे दिशेने येत असल्याची माहिती प्राप्त झाली. ह्या माहितीनुसार राजुरा पोलिसांनी पंचासमक्ष धाड घालुन तीन ट्रॅक्टरनमध्ये बिना परवाना अवैध्यरित्या वर्धा नदी घाटावरुन रेती चोरुन आणत असल्याचे आढळून आल्याने महिंद्रा कंपणीची लाल रंगाचा मुंडा बिना नंबरचा असलेला, लाल रंगाची ट्रॉली क्र. MH 34A 5050 अंदाजे किंमत रु. 8,00000/-, महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा मुंडा क्र. MH 34 CJ 6104 नंबर असलेला, लाल रंगाची ट्रॉली क्र. MH 34 BF 9826 अंदाजे किंमत रु. 8,00000/- तसेच महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा मुंडा क्र. MH 34BV 4943 नंबरचा असलेला, लाल “रंगाची ट्रॉली क्रं.MH 34 BV 4915 अंदाजे किंमत रु. 8,00000/- असे तीन ट्रॅक्टर व सर्व ट्रॉली मधे असलेला जवळपास अडीच ब्रास अवैध रेती साठा अंदाजे किंमत रु. 12,500/- असा एकुण- 24,12,500/- रु. चा मुद्देमाल जप्त आला.
सदर गुन्हयामध्ये आरोपी 1) मिलींद प्रकाश अलोणे वय 32 वर्ष, रा, सकमुर ता. गोंडपिपरी, ह.मु. सास्ती वार्ड क्र. 4, ता. राजुरा, जि. चंद्रपुर 2) महेंद्र गजानन उपरे वय 50 वर्ष, व्यवसाय मजुरी 3) रोजकुमार सुरेश मरई वय 22 वर्ष, व्यवसाय ड्रायव्हर, 4) दिलीप नानाजी नरड वय 54 वर्ष, धंदा मजुरी, सर्व रा.सास्ती वार्ड क्र. 4, ता. राजुरा, जि. चंद्रपुर 05) महेंद्र हिरामन मरस्कोल्हे वय 34 वर्ष, धंदा ड्रायव्हर, रा. सोमनाथपुर वार्ड राजुरा, ता.राजुरा, 06) रमेश राजन्ना येला वय 50 वर्ष, धंदा मजुरी, रा. धोपटाळा ता. राजुरा, जि.चंद्रपुर यांचे विरूद्ध कलम 303 (2) भा. न्या. सं., सह कलम 48(7), 48(8) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम-1966, सहकलम – 21(1) (2) (3) गौण खनिज अधिनियम-1952, सह कलम130(1)/177, 50 मो.वा.का. अन्वये कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही चंद्रपुर जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा विभाग दिपक साखरे यांचे मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी हिरडे, सपोनी राऊत यांच्या नेतृत्वात सपोनी नन्नावरे, पोउपनि भिष्मराज सोरते, पोलीस अंमलदार रामेश्वर चहारे, विनोद मडावी, अविनाश बांबोडे यांनी केली आहे.