ताज्या घडामोडी

साठ वर्षाच्या वृद्धाला लुटले

61 हजाराचा मुद्देमाल केला लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यातील गोंदन खेड येथील साठ वर्षीय इसम देऊळगाव राजा ते सिंदखेड राजा रोडवरील गिरोली तुळजापूर रस्त्याने दुचाकी वरून जात असताना दिनांक 9 चा रात्रीला अज्ञात आरोपींनी त्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुष यांनी त्यांना गाडीवरून खाली पाडून त्यांच्या जवळील रोख रकमेसह 61 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की. फिर्यादी केशव शंकर मांटे वय साठ वर्ष राहणार गोंदन खेड तालुका देऊळगाव राजा हे त्यांच्या दुचाकीवरून देऊळगाव राजा सिंदखेड राजा रोडवरील गिरोली खुर्द रस्त्याने जात असताना दिनांक नऊ च्या रात्रीला एका अनोळखी इसमाने त्यांना हात दिला. त्यावेळेस ते थांबले असता तुम्ही जेथे जात असाल तेथे पर्यंत मला येऊ द्या असे अज्ञात आरोपींनी सांगितले. त्यावेळी ते मार्गस्थ होत असताना गुगळादेवी मंदिरासमोरील निर्जन स्थळी त्यांच्या गाडीवर असलेल्या आरोपीने अन्य आरोपींना बोलावून घेतले दबा धरून बसलेल्या अन्य एक पुरुष आणि दोन अज्ञात महिला आरोपींनी फिर्यादी वृद्ध इसमाला खाली पाडले आणि मारहाण केली.

आम्ही पोलिस आहोत असे म्हणून त्यांच्याकडे दहा ग्रॅम चे अँटी किंमत 50 हजार रुपये, खिशातील एक हजार रुपये नगदी, मोबाईल किंमत दहा हजार, असा एकूण 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून लंपास केला या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार अनोळखी आरोपीविरुद्ध पुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले करीत आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये