Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

चोरट्याचा कृषी साहित्यावर डोळा., 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास 

सिंचनासाठी लावलेले सोलर पंपाचे पॅनल लंपास 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी  चोरट्याने आपला मोर्चा आता शेतकऱ्याच्या शेतातील लावलेले सोलार पॅनल आणि कृषी पंपाकडे वळविला असून अशाच प्रकारची घटना तालुक्यातील गिरोली बुद्रुक येथे घडली , सोलर पंपाचे पाच पॅनल आणि इतर साहित्य असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी दिनांक 10 जानेवारी रोजी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की. तालुक्यातील गिरोली बुद्रुक येथील फिर्यादी शेतकरी घनश्याम देवराव पारेकर यांच्या शेतातील विहिरीवर सिंचनासाठी 2020 मध्ये इलेक्ट्रिकल कंपनीचे सोलार पंपाचे एकूण पाच पॅनल बसवलेले होते.

त्यावर तीन एचपी ची मोटरपंप, केबल, आणि पाईप असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल दिनांक 4 जानेवारीला लंपास केल्याची घटना घडली होती आज देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक संजय गोरे करीत आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये