Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नगर परिषदेच्या वतीने सेवानिवृत्त ग्रंथपाल सन्मती जैन यांचा सत्कार 

(शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केला शुभेच्छांचा वर्षाव)

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा नगरपरिषदेमध्ये कार्यरत ग्रंथपाल सन्मती जैन हे नियत वयोमानानुसार दिनांक 31/12/24 रोजी नप च्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल नगरपरिषद प्रशासनाने त्यांना दिनांक नऊ जानेवारी 25 रोजी यथोचित सन्मान करून त्यांना भावपूर्ण निरोप दिला यावेळी नप चे प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी निरोप समारंभात बोलताना सांगितले की मी या नप मध्ये रुजू झाल्यापासून जैन हे माझे सोबत काम करीत आहेत त्यांना कोणत्याही विभागाचे काम सांगितले असता ते तत्परतेने तयार होऊन ते काम पूर्णत्वास नेतात आज पर्यंत त्यांनी अनेकांची अशक्य असलेली कामे स्वतःची कल्पक बुद्धी वापरून शक्य करून दाखवलेली आहे कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे हे त्यांचे कडून शिकण्यासारखे आहे असे त्यांनी सांगितले.

 याबाबत सविस्तर असे की नगरपरिषदचे ग्रंथपाल सन्मती जैन हे नियत वयोमानानुसार 31 डिसेंबर रोजी सेवा केली झाले त्यांनी या नगरपरिषद मध्ये जवळपास 38 वर्षे सेवा दिलेली असून ग्रंथपाल व्यतिरिक्त त्यांनी लेखापाल. रोखपाल. पाणीपुरवठा पर्यवेक्षक. या पदावर यशस्वीरित्या काम केले असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा या योजनेतून शहरात हजारो झाडे लावली असून ठीक ठिकाणी ऑक्सिजन पार्क निर्माण केलेले आहे याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करून या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर त्यांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असल्यामुळे त्यांनी जायंट्स वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 150 नागरिकांचे मरणोत्तर नेत्रदान करून घेण्यात यश मिळविले आहे या कामाची पावती म्हणून त्यांना जालना येथील गणपती नेत्रालयाचे वतीने सतत तेरावेळा नेत्रदान प्रोत्साहक म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे.

आज आयोजित निरोप समारंभात त्यांच्यावर त्यांच्या चाहत्याकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यावेळी मंचकावर माजी नगरअध्यक्ष तुकाराम खांडेभराड, गोविंदराव झोरे, माजी उपाध्यक्ष अनिल सावजी, नगर परिषद चे मुख्याधिकारी अरुण मोकळ उपस्थित होते तर त्यांना त्यांचे ८२/८३ ब्याच च्या वर्गमित्रांकडून जायंटस परिवाराकडून मातृतीर्थ पत्रकार संघाकडून तालुका पत्रकार संघाकडून व्हॉईस ऑफ मीडिया. भारतीय जैन संघटना विविध राजकीय सामाजिक वैद्यकीय व्यवसायातील मंडळी तसेच नप प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे कडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

यावेळी वर्गमित्र रमेश दंदाले,सुनील घुगे,सेवानिवृत्त कर्मचारी गोविंद अहिरे, नंदलाल शर्मा,तुकाराम खांडेभराड, अनिल सावजी, मुख्याधिकारी अरुण मोकळ या सर्वांनी सन्मती जैन यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्याविषयी आलेले अनुभव विशद करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन नगर परिषद चे प्रकल्प अधिकारी राजेंद्र वानखेडे यांनी केले कार्यक्रम यशस्वीते साठी न प सर्व विभागप्रमुखांनी मोलाचे सहकार्य केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये