ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ह भ प उदबोध महाराज पैठणकर यांचे दुबई येथे कीर्तन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय व महर्षी वशिष्ठ वेद विद्यालयाचे प्रधान अध्यापक ह भ प वेद विभूषण उदबोध महाराज पैठणकर यांचे दुबई येथे 12 जानेवारी रोजी किर्तन व प्रवचन चे आयोजन करण्यात आले आहे.

दुबई येथील समा टॉवर कम्युनिटी हॉल मध्ये आयोजित किर्तन महोत्सवात उदबोध महाराज पैठणकर यांचे कीर्तन व प्रवचन होणार आहे. दुबई येथे वास्तव्यास असणाऱ्या भारतीय नागरिकांनी सदर कार्यक्रम आयोजित केला आहे. याच कार्यक्रमांत महाराष्ट्रातील अनेक कलाकार आपली कला सादर करणार आहे.संत नगरी देऊळगाव राजा येथील महाराज साता समुद्रापार डंका वाजविनार असल्याने त्यांचे अभिनंदन केले जाते आहे.

पैठणकर महाराज दुबई करिता 7 जानेवारी रोजी रवाना झाले आहेत तत्पूर्वी संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय, महर्षी वशिष्ठ विद्यालय, जायंटस परीवार, तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जनसेवा ग्रुप, व मित्र परीवार च्या वतीने निरोप देण्यात आला.

यावेळी विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये