Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये श्री साई कॉन्व्हेंटचे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    भद्रावती येथील श्री साई कॉन्व्हेंट ने नुकतेच भद्रावती पंचायत समिती अंतर्गत महावीर हिंदी हायस्कूल, माजरी येथे पार पडलेल्या ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये सुयश प्राप्त केले.गैर आदिवासी क्षेत्र प्राथमिक गटात श्री साई कॉन्व्हेंटच्या कु. कृतिका आ. स्टीकर व सना सिद्दीकी या विद्यार्थिनींनी विज्ञान शिक्षिका प्रिया डोर्लिकर, प्रथम पतरंगे,साहेबा सिद्दीकी ह्यांच्या मार्गदर्शनात सादर केलेल्या परिवहन आणि संचार ह्या प्रतिकृतीला तृतीय क्रमांक प्राप्त होऊन जिल्हा स्तराकरिता निवड करण्यात आली.

या वेळी डॉ. प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी प.स. भद्रावती, आशुतोष सपकाळ गट विकास अधिकारी, ब्रजेश चव्हाण मुख्याध्यापक माजरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या विद्यार्थीनी ना सन्मांन चिंन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मांनित केले. यांच्या यशाकरिता मुख्याध्यापीका किरण कोथळे, संस्था अध्यक्षा श्रीमती कांता ताई गुंडावार, प्रा. अतुल गुंडावार, रूपा गुंडावार यांनी दोन्ही विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षिका यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये