Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सद्भावना चषकाचे मानकरी ठरली पंचायत समितीची चमु

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली पोलीस स्टेशन च्या वतीने महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधुन दि. 4 जानेवारी ते 6 जानेवारीपर्यंत सद्भावना क्रिकेट स्पर्धेचे संत योगी नारायण बाबा मठाच्या पटांगणावर आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पत्रकार संघ, पंचायत समिती संघ, वनविभाग, महसुल विभाग, नगरपंचायत, महावितरण यासह 13 संघ सहभागी झाले होते.

‘चला एकत्र येवु या’ या घोषवाक्याला घेवून सावली पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार आशिष बोरकर यांनी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्य सन 2022 मध्ये प्रथमच सावली तालुक्यात सद्भावना चषकाचे आयोजन करुन खेळाडू वृत्ती जोपासत तालुक्यातील कर्मचारी व पत्रकार संघाला एकत्रित आणुन नविन पायंडा रचला. स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहता या वर्षी सुध्दा सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रदिप पुल्लरवार यांनी सद्भावना चषकाचा वारसा कायम ठेवत जनता आणि पोलीस यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला.

एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी प्रमोद जोनमवार यांच्या नेतृत्वात पंचायत समिती चमु तर पोलीस उपनिरिक्षक सचिन मुसळे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनची चमु अंतीम सामन्यापर्यंत पोहचली. अंतीम सामन्यात गतवर्षी विजेता ठरलेल्या पंचायत समितीच्या संघाने विजयाची परंपरा कायम राखत या वर्षीसुध्दा सद्भावना चषकाचे मानकरी ठरले तर पोलीस स्टेशन हे उपविजेते ठरले. सावलीचे तहसिलदार प्रांजली चिरडे यांच्या हस्ते विजयी चमुला सद्भावना चषक देण्यात आले.

यावेळी उपवनसंरक्षक खेळकर, पाथरी पोलीस स्टेशनचे उपनिरिक्षक रासकर, नगरपंचायतचे उपाध्यक्ष संदिप पुण्यपकार, नगरसेवक विजय मुत्यालवार, प्रफुल वाळके, सतीश बोम्मावार आदि गणमान्य उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलीस स्टेशनचे कर्मचारी धिरज पिदुरकर व मोहन दासरवार यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये