Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भद्रावतीत सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय स्नेहमिलन सोहळा व मार्गदर्शन मेळावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       चंद्रपूर जिल्हा केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचारी समितीतर्फे शहरातील स्वागत सेलिब्रेशन सभागृहात दिनांक९ रोज गुरुवारला सकाळी साडेनऊ वाजता जिल्हास्तरीय केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचारी स्नेहमिलन सोहळा तथा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर समितीचे सचिव मनोहर साळवे, अध्यक्ष आनंद प्रकाश शर्मा, संदीप जग्गी, गौरव संगतानी,डॉक्टर स्नेहल मकेश्वर, सुरेश डोरले, किशोर साठे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर मेळाव्यात उपस्थित तज्ञांनी उपस्थित केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन, सिजीएच एस,आरोग्य विषयक माहिती देऊन त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

सदर सोहळ्यात ज्या सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांनी वयाचे 75 वर्षे पूर्ण केलेत व ज्यांच्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झालीत अशा कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तर मृत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सोहळ्याचे प्रास्ताविक मनोहर साळवे यांनी तर आभार पुरुषोत्तम मत्ते यांनी मानले. सोहळ्याला चंद्रपूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये