Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

तलाठ्याकडून मांगली शिवारातील अर्धवट पांदण रस्त्याची पाहणी

शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती तालुक्यातील मांगली येथील विवेकानंद विद्यालय ते कुमरे यांच्या शेताकडे जाणारा पांदण रस्ता अर्धवट तयार करण्यात आला. उर्वरित रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने शेतकऱ्यांना शेती करण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे उर्वरित रस्ता पावसाळ्यापूर्वी तयार करण्यात यावा यासाठी मांगली येथील शेतकऱ्यांतर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले होते.

या निवेदनाची तहसीलदारांनी तात्काळ दाखल घेत रस्त्याच्या पाहणी साठी तलाठी यांना मोक्याच्या ठिकाणी पाठवले. त्यानुसार तलाठी खुशाल तुराडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मोक्का ठिकाणी जाऊन सदर रस्त्याची पाहणी केली व अहवाल वरिष्ठांना सादर केला. सदर रस्ता अर्धवट तयार करण्यात आला,उर्वरित रस्त्यावरून अवैध रेती तस्करीचे ट्रॅक्टर जात असल्याने तो रहदारीस अयोग्य झाला आहे.

त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना बी बियाणे, शेतीपयोगी साधने तथा इतर साहित्य शेतात नेण्यास अडचणी येत असल्याने शेती करणे अवघड झाले आहे.यावेळी शेतकरी धनु निवलकर, मुजाहिद शेख,वामन कामटकर, प्रवीण सातपुते आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये