Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

पुनर्वसित गाव आसोला चक येथिल नागरिकांवर अन्याय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत आसोला चक (मेंढा) या गावाचे सायमारा (तू.) या गावाजवळ पुनर्वसन होत आहे. हे पुनर्वसन दुसऱ्यांदा होत असून आतादेखिल येथिल नागरिकांवर अन्याय केला जात आहे. आसोला चक व सावंगी दिक्षीत या दोन्ही गावाचे पुनर्वसन होत असून सावंगी दिक्षीत येथिल नविन कुटूंबधारकाच्या नावे मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या पत्रान्वये घरटॅक्स लागू करण्यात आले.

मात्र आसोला चक येथिल अंतरगाव ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसेवकांनी स्वतःची मनमानी करून केवळ एका व्यक्तीच्या नावाने घरटॅक्स लागू केले. त्याचा फायदा त्याला इतर कुटूंबाप्रमाणे मिळणार आहे. पण 58 नविन कुटूंबधारक व्यक्तीवर अन्याय होऊन त्यांना इतर योजना व मिळणारे अनुदान यापासून वंचित रहावे लागत आहे. त्याचबरोबर 18 वर्षाच्या वर असलेली तरुण / तरुणीची संख्या सुद्धा भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा कोणताही अनुदान देय नाही. असे पुनर्वसन अधिकारी वारंवार सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आदिवासी बहूल असलेल्या गावाला शासनाच्या अनेक सुविधा मिळतात. परंतू या गावाचे दुसऱ्यांदा पुनर्वसन होत असून सुद्धा अनुदान मात्र तुटपूंजे देण्यात येत आहे. त्यामुळे 18 वर्षावरील तरुण / तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अनुदान मिळावे तसेच गावातील काही लाभारर्त्यांचे घर टॅक्स लागून असून सुद्धा त्यांना अनुदाणातुन वागळण्यात आल्याचे नागरिकांत बोलले जात आहे आणि नविन 58 कुटूंबधारक व्यक्तीच्या नावाने घरटॅक्स लागू करून त्याचा अनुदान इतर कुटूंबाप्रमाणे मिळन्यात यावे यासाठी संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात येत आहेत जर गावाक्यांचा मांगण्या पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशारा गावाकयानी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये