Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नगराळा येथे आरोग्य शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नगराळा व टाटा कॅन्सर केअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगराळा येथे आरोग्य शिबीर पार पडले या शिबिरात अनेक रुग्णांची रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, कर्करोग तपासणी – मुखाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग व इतर किरकोळ आजाराची तपासणी करण्यात आली.

तसेच गावातील नागरिकांना किटकजन्य आजार व इतर आजाराबाबत माहिती देण्यात आली व त्यावर प्रतिबंधक उपाय या संदर्भात माहिती दिली.यावेळी उपसरपंच राजेश राठोड, वैद्यकीय अधिकारी प्रतीक्षा महाकुलकर,आरोग्य सहाय्यक दीपक सोनारकर,आरोग्य निरीक्षक संघरत्न ठमके, आरोग्य सेवक रामा चव्हाण,.आरोग्य सेविका माधुरी अरकरे, समीर गणवीर,आशा सेविका, आशा पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका, गावातील प्रतिष्ठित नागरिक टाटा कॅन्सर केअर फौंडेशन समन्वयक सूरज सोळंकी व संपूर्ण टाटा कॅन्सर केअर फौंडेशन टीम या शिबिरामध्ये एकूण ८० रुग्णांची तपासणी करून औषध उपचारा संदर्भात माहिती दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये