ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी घेऊन युवकाची आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी तालुक्यातील हारदोली वैनगंगा नदीच्या पुलावरून एका तरुणाने दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजता चे दरम्यान उडी घेऊन आत्महत्या केल्याचा केल्याची घटना घडली. रात्री शोध मोहीम राबविण्यात आली असता सुमारे 10 वाजताच्या दरम्यान मृतदेह आढळून आला. मृतकाचे नाव कौशिक रंगराव खोब्रागडे वय 22 वर्षे आहे. मृतकाचे वडील रंगराव खोब्रागडे हे पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून ब्रम्हपुरी येथे कार्यरत होते.आत्महत्या कशामुळे झाली हे निदान समोर आलेले नाही.

सदर घटनेचा पंचनामा करून शव विच्छेदना साठी उप जिल्हारुग्णालय ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. या घटनेचा तपास ब्रम्हपुरी पोलीस विभाग करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये