ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध गुटखा विक्री करणाऱ्या अड्ड्यावर पोलीस प्रशासन तसेच एलसीबीची धाड

सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 शहरांमध्ये गुटखा विक्रीचे प्रमाण वाढले असून त्यावर वचक बसावा यासाठी देऊळगाव राजा पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे देऊळगाव राजा पोलीस तसेच एलसीबीने केलेल्या संयुक्त कारवाई मध्ये चिखली जालना रोडवरील दोन गुटखा विक्री करणाऱ्या आरोपीकडून अवैध गुटखा तसेच इतर मुद्देमाल असा एकूण दोन लाख 14 हजार 440 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असून दोन आरोपी विरुद्ध आज देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 सविस्तर वृत्त असे की शहरातील तसेच ग्रामीण भागातील किराणा दुकान तसेच पान टपरी धारकाकडून शासनाने निर्बंध घातलेला तंबाखूजन्य अवैध गुटख्याची विक्री होत आहे याची दखल घेत देऊळगाव राजा पोलीस तसेच एलसीबी यांनी संयुक्त कारवाई केली, कार्यवाही दरम्यान चिखली जालना रोडवरील सिनगांव फाट्याजवळ दोन दुचाकी वरून अवैध गुटखा नेत्यांना दोन आरोपींना पकडण्यात आले त्यांच्याकडून नजर गुटखा 9000 हा मसाला कंपनीचे 120 पाकीट किंमत अठरा हजार ,बाजीराव गोल्ड पाकीट किंमत 3750 रुपये ,बाजीराव गोल्ड पान मसाला कंपनीचे पाकीट 250 रुपये , मसाला किंमत 250 रुपये, गोवा मसाला पाकीट किंमत 16625 रुपये , हिरा पान मसाला किंमत 2400 , हिरा पान मसाला कंपनी पाकीट ,राज निवास पान मसाला कंपनीचे पाकीट 57,960 रुपये, राज निवास पान मसाला २७६० रुपये , आरोपीची हिरो होंडा अंदाजे किंमत 50 हजार रुपये घटनास्थळावर दुसऱ्या आरोपीकडून राज निवास पान मसाला कंपनीचे पाकीट किंमत एक लाख 26 हजार तसेच इतर घुटका आणि सदर आरोपीची दुचाकी अंदाजे किंमत 50 हजार असा एकूण दोन लाख 14 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला

 सरकार पक्षातर्फे एलसीबी चे सुधाकर काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी महमंद इकबाल महमंद शफी वय वर्ष 39 राहणार कबाड पुरा देऊळगाव राजा, शेख अफसर शेख सबदर वय 38 वर्ष राहणार हकीमपुरा देऊळगाव राजा यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान सकलन अन्न सुरक्षा अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पीएसआय भारत चिरडे करत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये